घरमहाराष्ट्रकेंद्र सरकार निवडणुका आणि राजकारणात गुंतून पडलंय, काश्मिरी पंडितांचा आक्रोश दिसत नाही;...

केंद्र सरकार निवडणुका आणि राजकारणात गुंतून पडलंय, काश्मिरी पंडितांचा आक्रोश दिसत नाही; संजय राऊतांचा टोला

Subscribe

नोटबंदीनंतर काश्मिरातील दहशतवाद संपूर्णपणे खत्म होईल, असं वचन देणारं सरकार आज काश्मीरमध्ये आमच्या काश्मिरी पंडितांचं, जवानांचं आणि अनेक मुस्लिम पोलीस अधिकारी मारले जातायत हे महत्त्वाचं आहे. जे या देशाची सेवा करतायत, त्यांचं रक्षण करू शकत नाही, असं म्हणत संजय राऊतांनी मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.

मुंबईः केंद्र सरकारमधील पूर्णपणे गृहमंत्री असतील किंवा प्रधानमंत्री असतील हे पूर्णपणे निवडणुका आणि राजकारण यात गुंतून पडलेलं आहे. त्यांनी देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेकडे, काश्मीरमधल्या प्रश्नांकडे गांभीर्यानं लक्ष घालणं गरजेचं आहे. दुर्दैवानं फक्त राजकारण, विरोधकांवर हल्ले, ईडी, सीबीआयसारख्या संस्थांचा गैरवापर याच्यात गुंतलेल्या सरकारला काश्मिरी पंडितांचा आक्रोश दिसत नाही हे या देशाचं आणि देशातील हिंदूंचं दुर्दैव आहे, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊतांनी केंद्रातल्या मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. संजय राऊतांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते.

370 कलमाचा विषय नाही, जम्मू-काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश झाला म्हणून काही फरक पडलेला नाही. काश्मिरी पंडित रस्त्यावरती उतरले आहेत. सामुदायिक स्थलांतर करण्याच्या संदर्भात त्यांनी सरकारला सूचना दिलीय. केंद्रातलं सरकार हे प्रखर हिंदुत्ववादी आहे. प्रखर राष्ट्रवादी आहे. त्यानंतर काश्मिरी पंडितांच्या घरवापसीबाबत आग्रही असलेले सरकार आहे. नोटबंदीनंतर काश्मिरातील दहशतवाद संपूर्णपणे खत्म होईल, असं वचन देणारं सरकार आज काश्मीरमध्ये आमच्या काश्मिरी पंडितांचं, जवानांचं आणि अनेक मुस्लिम पोलीस अधिकारी मारले जातायत हे महत्त्वाचं आहे. जे या देशाची सेवा करतायत, त्यांचं रक्षण करू शकत नाही, असं म्हणत संजय राऊतांनी मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.

- Advertisement -

पळपुट्यांनी आमच्याकडे दुर्बिणी लावू नये

पत्रकारांनी रावसाहेब दानवेंनी दुर्बिणी लावून बाबरी पाडताना शिवसेनेचा एकही नेता नसल्याचं म्हटलं होतं, त्यावर संजय राऊत म्हणाले दुर्बिणीने ते काय काय पाहतात बघावं लागेल. त्यांच्याकडे दुर्बिणी लावल्या म्हणूनच ते बाबरी पडत असताना पळून गेले आणि शिवसैनिकांनी पाडली, असं सत्य कथन भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या तोंडून बाहेर पडलं. पळपुट्यांनी आमच्याकडे दुर्बिणी लावू नये, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

हार्दिक पटेलसुद्धा त्याच एका यंत्रणेचा बळी

तसेच हार्दिक पटेलच्या भाजप प्रवेशावर विचारले असता ते म्हणाले, हार्दिक पटेलनं आपल्या स्वतःच्या भूमिका तपासायला हव्यात. देशद्रोही या शब्दाची व्याख्या ही त्यांच्याविषयी केली होती, भारतीय जनता पक्षानं. असे अनेक मासे त्यांच्या गळाला लागत असतात. खोट्या केसेस, सत्तेचा गैरवापर त्याच्या माध्यमातून दबाव आणले जातात. हार्दिक पटेलसुद्धा त्याच एका यंत्रणेचा बळी आहे, असंही त्यांनी अधोरेखित केलं.

- Advertisement -

हेही वाचाः Target Killings in Kashmir: काश्मीरमध्ये हिंदूंना टार्गेट करून हत्या, गृहमंत्रालय अॅक्शन मोडवर, शाहांच्या हाती धुरा

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -