घरट्रेंडिंग‘अ‍ॅरेंज’पेक्षा लव्ह मॅरेजची केमिस्ट्री प्रभावी

‘अ‍ॅरेंज’पेक्षा लव्ह मॅरेजची केमिस्ट्री प्रभावी

Subscribe

आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणार्‍या कुटुंब या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार प्रेम विवाह यशस्वीतेचे प्रमाण ‘अ‍ॅरेंज मॅरेज’पेक्षाही अधिक आहे.

‘प्रेम करणे सोपे पण निभावणे अवघड’ असे म्हटले जाते. म्हणूनच प्रेम विवाहाच्या यशस्वीतेचे प्रमाण अतिशय अल्प असल्याचा निष्कर्ष सहजपणे काढला जातो. पण प्रत्यक्षात यात तथ्य आहे का? आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणार्‍या कुटुंब या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार प्रेम विवाह यशस्वीतेचे प्रमाण ‘अ‍ॅरेंज मॅरेज’पेक्षाही अधिक आहे. पत्रिकेत गुण जुळण्यापेक्षा मनं जुळण्याला महत्व प्रेम विवाहात दिले जात असल्यामुळे ते टिकण्याची शाश्वती अधिक असते असे संस्थेचे निरीक्षण आहे. व्हॅलेंटाईन डे निमित्त ‘आपलं महानगर’चा हा विशेष रिपोर्ट..

‘व्हॅलेंटाईन डे’ला प्रेमाच्या आणाभाका खाणारी आणि नव्याचे नऊ दिवस संपल्यावर ‘तू कौन और मै कौन’ म्हणनार्‍या मंडळींची संख्या मोठी असते; परंतु काही प्रियकर-प्रेयसी एकमेकांशिवाय जगूच शकत नाही. पण जातीयतेच्या भिंती प्रेमातील अडथळा ठरत असल्याचा विदारक अनुभव अनेकांना आजही येतो. यातील काही जोडपे व्यवस्थेविरोधात बंड करून प्रेम विवाह करतात तर काहीं व्यवस्थेला शरण जाऊन विवाहबद्ध न होण्याचा निर्णय घेतात. जातीय भेदभाव, परधर्मियांचा तिरस्कार, खानदानी दुश्मनी, आर्थिक परिस्थितीतील तफावती, नाते संबंधातील अडथळे यांमुळे साधारणत: प्रेमी युगलांना विवाहासाठी अडचणी निर्माण होतात. व्यवस्थेशी संघर्ष करण्याची तयारी असणार्‍यांना आधार देण्याचे काम नाशिकमधील कुटुंब संस्था करत आहे. या संस्थेने आजवर २६७ आंतरजातीय व आंतरधर्मिय विवाह लावून दिले आहेत. विवाहानंतर अनेकांना कुटुंबीय स्वीकारत नाही किंवा त्यांना विभक्त करण्यासाठीच प्रयत्न करतात. त्यामुळे विवाह लावून दिल्यानंतर काही महिने नवदांपत्याला आपल्या घरात सहारा देण्याचं कामही या संस्थेच्या सचिव चित्रा शिंदे करतात. कुटुंब संस्थेच्या मदतीने झालेले सर्वच्या सर्व प्रेम विवाह अद्याप टिकून असल्याचे शिंदे सांगतात. अ‍ॅरेंज मॅरेजला त्यांचा विरोध नाही. मात्र लव्ह मॅरेजला होणार्‍या विरोधाला टोलवण्याचे काम कुटुंबकडून केले जाते.

- Advertisement -

हेही वाचा – तरुणाई म्हणते, प्रेमासाठी ‘व्हॅलेण्टाइन्स डे’ची गरज काय?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -