घर महाराष्ट्र दसरा मेळाव्याला झालेल्या कोट्यवधींच्या खर्चावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, 800 जणांकडून...

दसरा मेळाव्याला झालेल्या कोट्यवधींच्या खर्चावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, 800 जणांकडून…

Subscribe

शिंदे म्हणाले की, या दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून मुंबईत शेकडो एसटी बस आल्या होत्या. यासाठी तब्बल 800 जणांनी एसटी महामंडळाकडे 10 कोटी रुपयांची रक्कम जमा केली होती , असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापन केल्यानंतर मागच्या वर्षी दसरा मेळाव्यामध्ये 3 हजारपेक्षा अधिक बस आणून विक्रम केला होता. लाखो लोक त्या ठिकाणई जमा करण्यात आले होते. परंतु त्या कार्यक्रमासाठी 10 कोटी रुपयांचा खर्च आला होता. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. यावरून आता स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितलं आहे. शिंदे म्हणाले की, या दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून मुंबईत शेकडो एसटी बस आल्या होत्या. यासाठी तब्बल 800 जणांनी एसटी महामंडळाकडे 10 कोटी रुपयांची रक्कम जमा केली होती , असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. (The Chief Minister Eknath Shinde clearly said about the expenditure of crores on Dussehra Melava is held from 800 people)

विरोधकांनी हा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित केला होता. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं होतं. ऑक्टोबर 2022 मध्ये बीकेसी येथे झालेल्या दसरा मेळव्यासाठी एसटी महामंडळाला 10 कोटी रुपये देण्यात आले होते. हे पैसे वेगवेगळ्या 800 लोकांकडून आले होते. त्यानुसार, एसटी महामंडळाकडून नियोजन करण्यात आले होते. मुंबईत पहिल्यांदाच ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन दसरा मेळावे झाले होते. या दोन्ही मेळाव्यांसाठी मिळून राज्यभरातून एकूण 1800 एसटी बसेसे मुंबईत आल्या होत्या.

- Advertisement -

(हेही वाचा: Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या अध्यादेशावर ठाम असणाऱ्या मनोज जरांगेंची प्रकृती खालावली )

2022 मध्ये ऑक्टोबर महिन्यात दसरा मेळाव्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या नावाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दसरा मेळावा घेतला. हा मेळावा मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुलाच्या मैदानावर आयोजित केला होता. त्यासाठी राज्यभरातून विविध कार्यकर्ते आणि जनता यांना मोफत राज्य परिवहन विभागाच्या बसेसने आणण्यात आलं होतं. यासाठी मुंबई विद्यापीठाकची काही जागा वाहनस्थळ म्हणून देखील भाड्याने घेतली गेली होती. त्याबाबात विरोधी पक्षांनी ओरडदेखील केली होती. मात्र या मेळाव्यासाठी साधारण 10 कोटी रुपये खर्च झाला होता. आता याच संदर्भातील खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -