कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीबाबत मुख्यमंत्री शिंदेंचे मोठं वक्तव्य; म्हणाले…

कसबा विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्षाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीवरून आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठं वक्यव्य केले आहे.

कसबा विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्षाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीवरून आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठं वक्यव्य केले आहे. कसबा आणि चिंचवड निवडणूक बिनविरोध व्हावी असे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले. (The Chief Minister Eknath Shinde Made A Big Statement Regarding The Pune By Election)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी पत्रकारांशी बातचित केली. त्यावेळी शिंदे म्हणाले की, “शिवसेनेच्या ठाकरे गटाचे विद्यमान आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे होणारी पोटनिवडणूक बिनविरोध केली, बिनविरोध निवडणुकीची प्रथा आपल्याकडे चालत आली असून, मुंबईतील पोटनिवडणुकीत भाजपने आणि आम्हीही उमेदवार मागे घेतला होता. त्यामुळे इतर पक्षांनी आपले उमेदवार देऊ नये या दोन्ही ठिकाणी बिनविरोध निवड व्हावी”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

दरम्यान, पोटनिवडणूक लढवण्यावरून मुंबईत राजकारण तापलं होतं. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे त्यांची पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यावेळी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी या निवडणुकीत भाजपाने आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला होता. मुरजी पटेल यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली होती. विशेष म्हणजे या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाला वेगळे चिन्ह आणि पक्ष नाव दिले होते.

त्याशिवाय, राष्ट्रावादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी पत्रकार परिषद घेऊन मागणी केली होती. तसेच, भाजपावर टीकास्त्र सोडले होते. त्याचप्रमाणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहत ही निवडणूक बिनविरोध व्हावी असे सांगितले. दरम्यान, या सगळ्या राजकीय नाट्यानंतर अखेर भाजपाने आपला उमेदवार मागे घेतला होता.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा विजय झाला आहे. या निवडणुकीत ऋतुजा लटके 66,247 मतांनी विजयी झाल्या.


हेही वाचा – पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरींना अटक, निवडणूक आयोगाला धमकावल्याचा आरोप