घरमहाराष्ट्रजितेंद्र आव्हाडांना मिळालेल्या धमकीचा तपास सीआयडीकडे

जितेंद्र आव्हाडांना मिळालेल्या धमकीचा तपास सीआयडीकडे

Subscribe

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना मिळालेल्या धमकीचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी)
वर्ग करण्यात आला आहे. यासाठी विशेष अधिकार्‍याची नेमणूक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत दिली.

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका अधिकार्‍याचा विषय सभागृहात मांडला. त्याची दखल आम्ही घेतली आहे. आव्हाड व त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षा दिली जाईल. लोकप्रतिनिधींना अशी धमकी दिली जात असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. आव्हाड यांची मुलगी आमच्याही मुलीसारखी आहे. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.

- Advertisement -

मात्र ठाणे महापालिकेतील सहायक आयुक्त महेश आहेर यांची किमान बदली करावी. कारण त्यांच्या कार्यालयात ते पैसे मोजत असल्याचा व्हिडीओ आहे. त्यांनी काही अधिकार्‍यांची नावे घेतली आहेत. त्यामुळे त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करावी, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली. त्यावर सध्या तरी हे प्रकरण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे वर्ग करण्याची आवश्यकता नाही, पण सीआयडीच्या तपासात काही तथ्य आढळल्यास याचा तपास निश्चितच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे वर्ग केला जाईल, असेही फडणवीस म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -