उद्या मुख्यमंत्री ठाण्यात, शहर सौंदर्यीकरण आणि स्वच्छता अभियानाचे शुभारंभ करणार

ठाणे  : मुख्यमंत्री पदाची धुरा स्वीकारल्यानंतर प्रथमच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या ठाणे महापालिकेत येणार आहे. निमित्त आहेत, शहर सुशोभिकरण आणि स्वच्छता अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. याचवेळी, महापालिकेमार्फत सुरु असलेल्या विविध प्रकल्पांचा आणि महापालिकेच्या विस्कटलेल्या आर्थिक घडीचा देखील आढावा घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट तितकी महत्वाची असल्याने सर्वांचे या वारीकडे आता लागून बसलेले आहे.

ठाणो महापालिकेच्या माध्यमातून मागील काही महिन्यापासून शहर सुशोभिकरणाला सुरवात झाली आहे. तसेच स्वच्छता मोहीम देखील हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार शहरातील विविध रस्ते, उड्डाणपुल, सोसायटीच्या सरंक्षण भिंती देखील विविध रंगानी सजविण्यात आल्या आहेत. तसेच स्वच्छतेच्या बाबतीत देखील महापालिका क्रमांक एक वर येण्यासाठी आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह पालिकेने कंबर कसली आहे. मागील काही दिवसात त्याचा परिणाम देखील ठाण्याच्या विविध भागात दिसून आला आहे. त्याच अनुषंगाने आता, मुख्यमंत्री स्वच्छता अभियान आणि शहर सौंदर्यीकरण अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

शनिवारी सकाळी ११.३० वाजता महापालिका मुख्यालयात ते उपस्थित राहणार असून या अभियानाचा शुंभारभ केला जाणार असल्याची माहिती महापालिका सुत्रंनी दिली. त्यामुळे मुख्यालय सुशोभिकरणार केले जात असून साफसफाई देखील केली जात आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच महापालिका मुख्यालयात येत आहेत. यापूर्वी २०१९ मध्ये क्लस्टर योजनेचा शुभारंभ करण्यासाठी ते महापालिका मुख्यालयात आले होते. त्यानंतर ते मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच ठामपा मध्ये येणार आहेत.


हेही वाचा : शहापूरकर भूकंपाच्या धक्क्याच्या सावटाखाली, भूकंपग्रस्त गावात कापडी तंबू