घरताज्या घडामोडीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा सामान्य माणूस केंद्रबिंदू; मुख्यमंत्री शिंदेंचे प्रतिपादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा सामान्य माणूस केंद्रबिंदू; मुख्यमंत्री शिंदेंचे प्रतिपादन

Subscribe

सामान्य माणूस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता. मानवमुक्ती हे त्यांचे एकमेव ध्येय होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातीलच नव्हे जगभरातील पडित, वंचित यांच्या हक्कांना आणि मानवी प्रतिष्ठेला वैचारिक आणि सघटनात्मक बळ मिळवून दिले, असे सांगत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

सामान्य माणूस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता. मानवमुक्ती हे त्यांचे एकमेव ध्येय होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातीलच नव्हे जगभरातील पडित, वंचित यांच्या हक्कांना आणि मानवी प्रतिष्ठेला वैचारिक आणि सघटनात्मक बळ मिळवून दिले, असे सांगत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६६ वा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तसेच, उपस्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायींना संबोधित केले. (The common man is central to Dr Babasaheb Ambedkar thoughts Greetings from CM Eknath Shinde)

“महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आपण संपूर्ण जगात ताठ मानेने उभे आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेने सर्वसामान्यांना अधिकार प्रधान केले. जगण्याचे हक्क दिले. त्या अधिकारांमुळेच सर्वसामान्य नागरिकांना सर्वोच्च स्तरावर जाऊन काम करण्याची संधी मिळाली. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे या राज्यातही सर्वसामान्य मुख्यमंत्री म्हणून मला राज्याची सेवा करण्याची संधी मिळाली. महापुरूष इतिहास घडवतात, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर अपमानकारक जीवन जगणाऱ्या लोकांमध्ये स्वाभिमानाची फुकर घालून इतिहास बदलला. या देशाला, समाजाला नवी दिशा दिली”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या विद्येचा तळागाळातील तमाम लोकांना सशक्त करण्यासाठी केला. सामान्य माणूस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता. मानवमुक्ती हे त्यांचे एकमेव ध्येय होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातीलच नव्हे जगभरातील पडित, वंचित यांच्या हक्कांना आणि मानवी प्रतिष्ठेला वैचारिक आणि सघटनात्मक बळ मिळवून दिले. दलीत समाजात शेकडो वर्षांपासून रुजलेली न्यूंनगंढाची भावना काढून टाकली. गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी त्यांनी संघटीत बळ दिले. त्यामुळे आज दलीत बाधवांमध्ये मोठ्या प्रमाणात आत्मविश्वास निर्माण झाला आहे”, असेही यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले.

“मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि सरकार स्थापन केल्यानंतर चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आणि त्यांनी दिलेल्या विचारांवर आमचे सरकार वाटचाल करेल, असा निर्धार केला. त्याशिवाय, ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वास्तव्य होते, त्या राजगृहाला भेट दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणी जपल्या जातील”, असेही म्हटले.

- Advertisement -

याशिवाय, “हे आपले सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे. गेल्या चार ते पाच महिन्यांमध्ये अनेक निर्णय या सरकारने घेतले. इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक लवकरच पूर्ण करणार, शासकीय वसतीगृहांची संख्या वाढवत आहोत, जास्तीत जास्त मुलांना शिष्यवृत्ती कशी मिळेल याचीही तपासणी करत आहोत. स्पर्धा परीक्षांमधील विद्यार्थ्यांना आम्ही बार्टीमार्फत सगळी मदत करत आहोत. यांसह अनेक महत्वाचे निर्णय आपले हे सरकार घेत आहे. राज्यभरातून अनेक लोक भेट देत आहेत”, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.


हेही वाचा – राज्यपालांसह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे महामानवाला अभिवादन

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -