एकीकडे खाद्यतेलाचे दर कमी झाल्यानं सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी महागाईमुळे नागरिकांचे घरखर्चाचे बजेट कोलमडलं आहे. डाळींच्या वाढलेल्या किंमतींनी ताटातून वरण गायब होण्याची शक्यता आहे. तूर डाळ आता प्रतिकिलो 170 रुपयांवर पोहोचली आहे. मागच्या दोन महिन्यात 50 रुपयांची वाढ झाली आहे. (The common man s budget collapsed Turdal at Rs 170 per kg up Rs 50 in two months)
नागरिकांना दिलासा देण्यासाठी आता सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. देशात तूर डाळीचे वाढलेले भाव पाहता केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना तूर डाळीच्या साठ्यावर लक्ष ठेवण्यास आणि राज्यातील सर्व व्यापाऱ्यांनी जमा केलेल्या साठ्याची माहिती सरकारला देण्यास सांगितले आहे.
रोज बदलणाऱ्या भावामुळे किरकोळ व्यापारी हैराण
तूरडाळ, मूगडाळ, उडीद डाळ, हरभराडाळ, मसूरडाळ याचे दर दोन दिवसांनी बदलत असल्यामुळे व्यापारी मोठ्या प्रमाणात माल विकतही नाहीत. रोज बदलणाऱ्या भावामुळे ग्राहकांवरही त्याचा थेट परिणाम होताना दिसत आहे.
मागच्या वर्षी कमी झालेली डाळीची लागवड अनियमित पाऊसमान याचा डाळीचं उत्पादनावर झालेला परिणाम आणि यावर्षी महाराष्ट्रासह इतर राज्यातही पावसानं दिलेली ओढ याचा थेट परिणाम शेतमाल उत्पादनावर झाला आहे. यामुळे संपूर्ण देशांमध्येच डाळीचे उत्पादन यावर्षी कमी प्रमाणात आहे. याचा थेट परिणाम बाजारातील भाव वाढीवर झाला आहे. पाऊस पडेल आणि उत्पादन चांगलं येईल अशी स्थिती आता राहिली नाही. पावसानं दिलेल्या ओढीमुळे उत्पादनावर प्रचंड परिणआम झाला आहे. पुढील हंगामातच उत्पादनाची शक्यता असल्यानं सर्व प्रकारच्या डाळीची भाव वाढ झाल्याचं बोललं जात आहे.
(हेही वाचा: हा भेदभाव कशासाठी…? पंतप्रधान मोदींचे दोन व्हिडीओ शेअर करत आव्हाडांचा सवाल )