Friday, June 4, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र सरकारमध्ये विसंवाद? काँग्रेसचे मंत्री लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

सरकारमध्ये विसंवाद? काँग्रेसचे मंत्री लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

Related Story

- Advertisement -

मदत व पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेसचे आमदार यांनी गुरुवारी अनलॉकची घोषणा केली. मात्र, काही वेळातच मुख्यमंत्री कार्यालयातून अद्याप निर्बंध हरवलेले नाहीत, असं स्पष्ट करण्यात आलं. यावरून झालेल्या गोंधळामुळे सरकारमध्ये विसंवाद असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सरकारमध्ये विसंवाद नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच जर काही विसंवाद असेल तर काँग्रेसचे मंत्री मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं बाळासाहेब थोरात म्हणाले.

राज्य सरकारमध्ये कसलाही विसंवाद नाही. विजय वडेट्टीवार यांनी गोंधळानंतर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. वडेट्टीवार हे गत्यंतर ज्येष्ठ मंत्री आहेत. त्यांना राज्यकरभाराचा अनुभव आहे. पण काही विषयांवर संभ्रम असून मुख्यमंत्र्यांना भेटून तो दूर करू. लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊ असं थोरात म्हणाले.

- Advertisement -

सरकारमध्ये कसलाही विसंवाद नाही आहे. सगक्यानं एकत्र मिळून काम करावं लागेल. समन्वय वाढवावा लागेल, असं थोरात म्हणाले. मुख्यमंत्री कोरोना काळात चांगलं काम करत आहेत. कोरोना संकटावर नियंत्रण मिळविण्यात आपल्याला यश आलं आहे. आमचं प्राधान्य आरोग्याला आणि जीविताला राहिलं आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

- Advertisement -