घरमहाराष्ट्रकाँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी १५० जागांवर बाजी मारणार

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी १५० जागांवर बाजी मारणार

Subscribe

मी माझ्या आमदारकीसाठी नाही तर आघाडीचे आमदार निवडून आणण्यासाठी काम करणार आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी ७५ म्हणजेच एकूण १५० आमदार निवडून येतील, असा विश्वास महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केला. अहमदनगर शहर मतदारसंघ राष्ट्रवादीकडे जाणार असल्यामुळे मी निवडणूक लढविण्याच्या विचारात नाही, असे तांबे यांनी शनिवारी ‘मायमहानगर’च्या खुल्लमखुल्ला या फेसबुक लाईव्हमध्ये स्पष्ट केले.

२०१४ साली आघाडी तुटल्यानंतर तांबे यांनी अहमदनगर शहर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या संग्राम जगताप यांनी इथून विजय मिळवला होता. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांचा फेसबुक लाईव्ह या कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अनेक नेत्यांनी सत्ताधारी पक्षांची वाट धरली. यापैकी उर्मिला मातोंडकर आणि हर्षवर्धन पाटील या दोन नेत्यांबाबत आपल्याला दुःख वाटल्याचे तांबे यांनी सांगितले. अंतर्गत कुरबुरीमुळे उर्मिला मातोंडकर यांनी पक्ष सोडला असला तरी त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. भविष्यात त्यांची आम्ही समजूत घालण्याचा प्रयत्न करु, असे तांबे म्हणाले.

- Advertisement -

तर हर्षवर्धन पाटील यांना थांबविण्यासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी प्रयत्न करायला हवे होते, अशीही खंत तांबे यांनी बोलून दाखवली.

सोनिया गांधी महाराष्ट्रात प्रचारसाठी येणार
राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदाची धुरा पुन्हा एकदा आपल्या खांद्यावर घेतली. एका बाजूला भाजपतर्फे अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात सभा घेत प्रचाराचा नारळ फोडलेला आहे. शरद पवार राज्यभर दौरे करत आहेत. मात्र काँग्रेसच्यावतीने सोनिया गांधी यांनी अद्याप महाराष्ट्रात पाऊल ठेवलेले नाही. आताच आचारसंहिता लागू झालेली आहे. सोनिया गांधी महाराष्ट्रात प्रचारासाठी येतील, असा विश्वास तांबे यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -