Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश "काँग्रेस पक्ष हा दीनदलितांचा आवाज आणि बाकीचे..."; प्रणिती शिंदेंची प्रकाश आंबेडकरांवर टीका

“काँग्रेस पक्ष हा दीनदलितांचा आवाज आणि बाकीचे…”; प्रणिती शिंदेंची प्रकाश आंबेडकरांवर टीका

Subscribe

सोलापूर : काँग्रेस पक्ष हा दीनदलितांचा आवाज आहे. बाकी निवडणुकीपुरते येतात, अशा शब्दात सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी नाव न घेता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली. प्रणिती शिंदेंनी सोलापुरातील मातंग एकता आंदोलन आणि शहर उत्तर युवक काँग्रेसच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्कार सोहळ्यात बोलताना पंतप्रधान मोदी आणि आंबेडकरांवर निशाणा साधला.

प्रकाश आंबेडकरांसंदर्भात बोलताना प्रणिती शिंदे म्हणाले, “केवळ काँग्रेस पक्ष हा दीनदलितांचा आवाज आहे. बाकी निवडणुकीपुरता येतात आणि जातात. यामुळे मला असे वाटते की, रक्ताच्या नात्यापेक्षा विश्वासाचे नाते ही खंबीर आहे. हे नाते टिकवणे ही तितके जास्त महत्त्वाचे आहे.”

देशात दीनदलितांचा आवाज दाबला जातोय

- Advertisement -

पंतप्रधानांवर टीका करताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, “जेव्हा देशात मागासवर्गींयांना न्याय मिळतो. तेव्हा लोकशाही खंबीर होते. आज देशात उलट होताना दिसत आहे. देशात दीनदलितांचा आवाज दाबला जातोय. यामुळे लोकशाहीची हत्या होते की, असा प्रश्न मला पडतोय आणि मोदी करत आहेत. पण विरोधकांना बोलू न देणे आणि दीनदलितांवर होणाऱ्या अत्याचारावर न बोलताच त्यांचे समर्थन करतात”

हेही वाचा – मुंबईतील ‘इंडिया’च्या बैठकीतून ‘भाजपा चलो जाव’चा नारा – नाना पटोले

सोलापूरात भावी खासदार म्हणून प्रणिती शिंदेचे बँनर

- Advertisement -

आगामी लोकसभा निवडणुकीत खासदारकी मिळवण्यासाठी प्रणिती शिंदे यांची वाटचाल सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांना तिकीट देण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूरामधील काँग्रेस भवनसमोर बँनर लाण्यात आले. या बँनरमध्ये प्रणिती शिंदे ‘भावी खासदार’ असा उल्लेख करण्यात आला आहे.

- Advertisment -