घरताज्या घडामोडीमाझ्याच पक्षातील नेत्याचा माझ्याविरोधात कट; अब्दुल सत्तारांचा गंभीर आरोप

माझ्याच पक्षातील नेत्याचा माझ्याविरोधात कट; अब्दुल सत्तारांचा गंभीर आरोप

Subscribe

गेल्या अनेक दिवसांपासून टीईटी आणि गायरान भूखंड घोटाळ्याप्रकरणी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमधील कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना विरोधकांनी धारेवर धरले आहे. नुकताच विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन झाले. या अधिवेशनात या घोटाळ्यांप्रकरणी विरोधकांनी अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली.

गेल्या अनेक दिवसांपासून टीईटी आणि गायरान भूखंड घोटाळ्याप्रकरणी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमधील कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना विरोधकांनी धारेवर धरले आहे. नुकताच विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन झाले. या अधिवेशनात या घोटाळ्यांप्रकरणी विरोधकांनी अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली. मात्र, याप्रकरणी आता अब्दुल सत्तार यांनी स्वत:च्याच पक्षातील म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील नेत्यावर आरोप केले आहेत. नाव न घेता संबंधित नेत्यावर अब्दुल सत्तार यांनी आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी माझ्याच पक्षातील नेत्याने माझ्याविरोधात कट रचल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे सध्या राज्याच्या राजकारणात अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. (The conspiracy of my own party leaders against me serious allegation of Abdul Sattar)

टीईटी घोटाळा, सिल्लोड येथील कृषीमहोत्सव आणि वाशीम येथील गायरान जमिनीवरून अब्दुल सत्तार यांच्यावर मोठ्याप्रमाणावर आरोप होत आहे. दरम्यान यावर पहिल्यांदाच अब्दुल सत्तार यांनी मौन सोडले आहेत. राज्याचे कृषीमंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते अब्दुल सत्तार यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला मुलाखत देताना बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील नेत्यावर नाव न घेता गंभीर आरोप केले आहेत.

- Advertisement -

माझ्याच पक्षातील नेते माझ्याविरोधात कट

“माझ्याच पक्षातील नेते माझ्याविरोधात कट रचत असल्याचा गंभीर आरोप सत्तार यांनी केला आहे. मला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. यात काही माझ्या पक्षातील असू शकतात तर काही माझे हितचिंतक आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरात होणारी चर्चा बाहेर येत आहे. त्यामुळे आमच्यातील कोणेतरी बाहेर बातम्या पुरवत असल्याचा आरोप सत्तार यांनी केला आहे. तर ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही त्यांच्याकडून हे सर्व सुरु आहे” असा गौप्यस्पोट अब्दुल सत्तार यांनी केला.

- Advertisement -

अब्दुल सत्तार यांच्या या विधानाने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. त्यामुळे शिंदे गटात अंतर्गत कुरघोडी सुरु असल्याची चर्चा आता रंगताना पाहायला मिळत आहे.


हेही वाचा – नववर्ष स्वागत : हॉटेल्स, परमिट रूम, बिअर बार पहाटे ५ वाजेपर्यंत राहणार सुरु; प्रशासनही सज्ज

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -