घरमहाराष्ट्रकरोना लस सप्टेंबरपर्यंत उपलब्ध

करोना लस सप्टेंबरपर्यंत उपलब्ध

Subscribe

- पुण्यातील एसआयआयचा दावा

करोना लसीच्या चाचण्या तीन आठवड्यांत सुरू करण्यात येऊन त्या यशस्वी झाल्यास येत्या सप्टेंबरपर्यंत ही लस उपलब्ध होऊ शकेल, असा दावा पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (एसआयआय) सीईओ आदर्श पूनावाला यांनी केला आहे. यापूर्वी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या एका प्रसिद्धीपत्रकात करोना लसीकरणासंदर्भात नमूद करण्यात आले होते. एसआयआयची टीम ब्रिटनच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या डॉक्टरांशी विचार विनिमय करून काम करत आहे. संस्थेच्या प्रसिद्धी पत्रकानुसार, सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत बाजारात ही लस उपलब्ध होईल, मात्र चाचण्यांद्वारे सर्व आवश्यक सुरक्षा मानदंड आणि त्यासंदर्भातील हमी दिली गेली तर ते शक्य होईल, असे देखील म्हटले आहे.

ब्रिटनमध्ये करोनाची लस सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत तयार केली जाईल तसेच या लसीची क्लिनिकल चाचणी यशस्वी होण्याचीदेखील अपेक्षा आहे. भारतात या लसीची चाचणी मे महिन्यात सुरू करण्यात येईल, अशी आशा एसआयआयतर्फे व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, या लसीची चाचणी पूर्णतः यशस्वी झाल्यास सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत लस बाजारात येण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एसआयआय कोविड-19 ची लस बनवण्यास पूर्णपणे सुसज्ज आहे. याव्यतिरिक्त, संस्था कोविड-19 लसीसाठी एक नवीन सुविधाही तयार करत आहे. मात्र ते पूर्ण होण्यासाठी साधारण 2 ते 3 वर्षांचा अवधी लागेल. उपलब्ध असलेल्या एका युनिटमधून या लसीकरणाचे उत्पादन साधारण 3 आठवड्यात सुरू करण्यात येईल. पहिल्या सहा महिन्यांकरिता दरमहा 40 ते 50 लाख डोस तयार करण्याचे एसआयआयचे उद्दीष्ट आहे. यानंतर, यात वाढ केली जाऊन दरमहा एक कोटी डोस तयार केले जाऊ शकतात. तसेच सप्टेंबरपर्यंत लसीचे 2 ते 4 कोटी डोस तयार करण्याचे उद्दिष्ट एसआयआयने ठेवले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -