घरमहाराष्ट्रकोरोनाची लाट पुढील 8 ते 15 दिवस राहू शकते, अजित पवारांचं भाकीत

कोरोनाची लाट पुढील 8 ते 15 दिवस राहू शकते, अजित पवारांचं भाकीत

Subscribe

2 जून 2021 पर्यंत चांगली कामं करणाऱ्या गावांना 50 लाखांपर्यंत बक्षीस देण्यात येणार आहेत. कोविड मुक्त गाव या नावाखाली राज्य सरकारनं हे सुरू केलेलं आहे. पुणे जिल्ह्यात हा कार्यक्रम राबवणार आहे. पुण्यातील शाळा अजून 7 दिवस सुरू होणार नाहीत. तीन ग्रामपंचायतीला आपण बक्षीस देणार आहोत. पहिलं बक्षीस 50 लाख, दुसरं बक्षीस 25 लाख, तिसरं बक्षीस 15 लाख आहे.

पुणेः कोरोनाची लाट पुढील 8 ते 15 दिवस राहू शकते, असे भाकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेय. 2 जून 2021 पर्यंत चांगली कामं करणाऱ्या गावांना 50 लाखांपर्यंत बक्षीस देण्यात येणार आहेत, असंही अजित पवारांनी सांगितलंय. शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा परिषद आणि भारतीय जैन संघटनेतर्फे राबविण्यात येणाऱ्या कोविडमुक्त गाव अभियानाच्या जिल्हास्तरीय उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

कामगारांनी दोन्ही डोस घेतलेले आहेत की नाही ते पाहावे

2 जून 2021 पर्यंत चांगली कामं करणाऱ्या गावांना 50 लाखांपर्यंत बक्षीस देण्यात येणार आहेत. कोविड मुक्त गाव या नावाखाली राज्य सरकारनं हे सुरू केलेलं आहे. पुणे जिल्ह्यात हा कार्यक्रम राबवणार आहे. पुण्यातील शाळा अजून 7 दिवस सुरू होणार नाहीत. तीन ग्रामपंचायतीला आपण बक्षीस देणार आहोत. पहिलं बक्षीस 50 लाख, दुसरं बक्षीस 25 लाख, तिसरं बक्षीस 15 लाख आहे. अशा प्रकारची प्रोत्साहनपर बक्षिसं आपण ठेवलेली आहेत. पुणे जिल्ह्यातील 44 ग्रामपंचायतीत 2 वर्षांत एकही कोरोनाचा पेशंट मिळालेला नाही. त्यात भोर तालुक्यातील 17 गावं आहेत. औद्योगिक क्षेत्रातील कारखानदार आणि मालकांनी आपल्या कामगारांनी दोन्ही डोस घेतलेले आहेत की नाही ते पाहावे, त्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना घ्यायला सांगितलेली आहे, असंही अजित पवारांनी सांगितलंय. पुणे महानगर पालिकेच्या हद्दीतील उद्याने सकाळच्या सत्रात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे वेळापत्रकही लवाकरच जाहीर केलं जाणार आहे. शहरातील जलतरण तलाव सुरु करण्याचा निर्णय ही घेण्यात आला आहे. लसीचे दोन डोस घेतलेले नागरिक आणि स्पर्धांसाठी तयारी करणारे खेळाडू यांनाच जलतरण तलावात प्रवेश असणार आहे, असंही त्यांनी सांगितलंय.

- Advertisement -

ज्येष्ठ नागरिकांना शनिवार-रविवार बूस्टर डोस देण्यात येणार

सगळ्या कामगारांना दोन्ही लस दिल्याच पाहिजेत, अशा प्रकारची सक्ती करण्यात आलीय. ज्येष्ठ नागरिकांना शनिवार-रविवार बूस्टर डोस देण्यात येणार आहे. पर्यटन स्थळावर गर्दी हाताबाहेर गेल्यास तिथं निर्बंध लादू. 15 ते 18 वयोगटातील मुलांचं 51 टक्के लसीकरण झालंय. कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे. कोरोनाची लाट पुढील 8 ते 15 दिवस राहू शकते, असंही अजित पवार म्हणालेत.

तिन्ही पक्षांनी निवडणुका एकत्र लढल्यास संख्या प्रचंड वाढू शकते

तिन्ही पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलंय. या निवडणुका आम्ही तिघांनी एकत्र मिळून, पॅनल करून लढलो असतो आणि ते त्या ठिकाणी लढले असते तर गोष्ट वेगळी होती. चौघेही स्वतःचे आपापले उमेदवार देऊन लढलेले आहेत. चौघे वेगवेगळे लढून महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष किती होतायत ते बघा आणि त्यांचे किती होतायत ते बघा. तिघे एकत्र आले आणि निवडणुका लढल्या तर यांची संख्या प्रचंड वाढू शकते. दोघे एकत्र येऊन लढले तरी देखील संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो, असंही अजित पवारांनी सांगितलंय.

- Advertisement -

2017ला कलाकार म्हणून कोल्हेंनी तो करार केलेला होता

मला डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांचा फोन आला होता. डॉ. कोल्हेंना 2019 च्या आधी 15 दिवस मी चर्चा केलेली होती. चर्चा करून मी आमचे नेते पवार साहेबांकडे त्यांना नेले आणि त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. ही गोष्ट 2019ची आहे. त्यांनी 2019ला पक्षात प्रवेश केला. 2017ला त्यांनी कलाकार म्हणून तो करार केलेला होता. तेव्हाही त्यांनी गोडसेची भूमिका केली होती. एखाद्या कलावंताने एखाद्या पक्षाच्या भूमिकेबद्दल त्याचा कुठल्याही पक्षाशी त्यावेळेस संबंध नसताना अशा जुन्या गोष्टी अनेकांच्या बाबतीत घडलेल्या आहेत, असंही अजित पवारांनी अधोरेखित केलंय.


हेही वाचाः  Mumbai Fire : मुंबईतील ताडदेव इमारत आग दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -