घरमहाराष्ट्रदेश अमृतकाळ साजरा करतोय आणि शेतकरी आत्महत्या करतोय, जयंत पाटील यांची टीका

देश अमृतकाळ साजरा करतोय आणि शेतकरी आत्महत्या करतोय, जयंत पाटील यांची टीका

Subscribe

मुंबई : महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा तीव्र होत चालल्या आहेत. राज्यात 1 जानेवारी ते 31 जुलै यादरम्यान तब्बल 1 हजार 555 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याबाबत चिंता व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी, देश अमृतकाळ साजरा करत आहे आणि शेतकरी आत्महत्या करत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

हेही वाचा – येत्या आठवड्यात अपात्रतेसंदर्भात सुनावणी; गरज पडल्यास…; काय म्हणाले राहुल नार्वेकर?

- Advertisement -

शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या अधिकच वाढत चालल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत सहा शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. या सरकारच्या काळात हतबल झालेल्या शेतकऱ्यांना आपले जीवन संपवणे सोपे वाटले, हेच सरकारचे अपयश असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

- Advertisement -

गेल्या नऊ महिन्यांमध्ये विदर्भात 1 हजार 584 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असल्याची बाब समोर आली आहे. गेल्या 25 वर्षांतील ही सर्वाधिक संख्या आहे. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत सहा शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. कर्ज काढून पिक लावणी केली. मात्र अतिवृष्टीमुळे जमीन खरडून गेली. हातातोंडाशी आलेले पीक जमीनदोस्त झाले. देश अमृतकाळ साजरा करत असताना भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी मात्र विष पिऊन आत्महत्या करत आहे. ही धोक्याची घंटा सरकारने ओळखावी आणि शेतकऱ्यांना सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

हेही वाचा – OBC जनगणनेवरुन लक्ष विचलीत करण्यासाठी महिला आरक्षण; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

वडेट्टीवारांचीही टीका

राज्यात पावसाला आधीच उशिराने सुरुवात झाली. त्यात गेल्या अडीच महिन्यांमध्ये अत्यंत कमी पाऊस पडला आहे. हीच परिस्थिती राहिली तर आगामी काळात दुष्काळाचे मोठे संकट महाराष्ट्रावर येऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशा परिस्थितीत फक्त आश्वासन देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून मोकळे व्हायचे, हाच महायुती सरकारचा पॅटर्न असल्याची खरमरीत टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काल, गुरुवारी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -