घरमहाराष्ट्रसरकार उलथवण्याच्या कारस्थानात राज्यपाल सामील, माकपचा आरोप

सरकार उलथवण्याच्या कारस्थानात राज्यपाल सामील, माकपचा आरोप

Subscribe

भ्रष्ट मार्गाने जाम केलेला प्रचंड पैसा आणि केंद्रीय तपासयंत्रणा यांचा गैरवापर करून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार उलथून टाकण्याचे भारतीय जनता पक्षाचे कारस्थान समोर आले आहे. या कारस्थानात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सामिल असल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केला आहे. बहुमत चाचणीत पक्षाचे आमदार विनोद निकाले ठाकरे सरकारला पाठिंबा देणार आहेत.

विधानसभा अध्यक्षांची नियुक्ती करण्यात राज्यपाल दिर्घकाल आडवे आले –

- Advertisement -

राज्यपालांनी तातडीने 30 जूनला सभागृहात बहुमत सिद्ध करण्याचा महाविकास आघाडीला आदेश दिला आहे. विधान परिषदेच्या १२ आमदारांची आणि नियमित विधानसभा अध्यक्षांची नियुक्ती करण्यात राज्यपाल दीर्घकाळ आडवे आले आहेत. आता हा बहुमत चाचणी करण्याचा आदेश हा संविधानाची हत्या करणारा असल्याचे माकपचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी केला आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष विरोध करत राहणार –

- Advertisement -

संविधानातील लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि संघराज्य प्रणालीचे रक्षण करण्यासाठी, महाराष्ट्राचा सन्मान राखण्यासाठी केंद्रातील भाजपच्या फॅसिस्ट व धर्मांध एकाधिकारशाहीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष नेहमीच कसून विरोध करत आला आहे आणि यापुढेही करत राहणार असल्याचे त्यांनी म्हटले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -