घरमहाराष्ट्रपुणेसद्यस्थितीवरून राज ठाकरेंनी रेखाटले अजित पवारांच्या चेहऱ्यावरचे हावभाव

सद्यस्थितीवरून राज ठाकरेंनी रेखाटले अजित पवारांच्या चेहऱ्यावरचे हावभाव

Subscribe

आज (ता. 05 मे) राज ठाकरे यांनी पुण्यातील कार्टुनिस्ट कंबाईन या संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या व्यंगचित्र प्रदर्शनाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या व्यंगचित्राच्या माध्यमातून अजित पवार यांचे सध्याच्या राजकीय परिस्थितीवरील भाव रेखाटले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना व्यंगचित्र काढण्याची आवड आहे आणि ते उत्तम व्यंगचित्रकार आहेत, याबाबत सर्वांनाच माहित आहे. ते जेव्हा कधी कार्यक्रमांना हजेरी लावतात, त्यावेळी त्यांना व्यंगचित्र काढण्याचा आग्रह करण्यात येतो. त्यांनी काढलेली बरीचशी व्यंगचित्रे ही सोशल मीडियावर देखील प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे व्यंगचित्र काढून त्यांच्यावर निशाणा साधला होता. आज (ता. 05 मे) राज ठाकरे यांनी पुण्यातील कार्टुनिस्ट कंबाईन या संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या व्यंगचित्र प्रदर्शनाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या व्यंगचित्राच्या माध्यमातून अजित पवार यांचे सध्याच्या राजकीय परिस्थितीवरील भाव रेखाटले.

हेही वाचा – “उद्धव ठाकरे विकासाच्या विरोधात…”, देवेंद्र फडणवीसांची टीका

- Advertisement -

शांत आणि गप्प बसलेले, नजरेतून आपला रोख दर्शवणारे अजित पवार राज ठाकरेंनी रेखाटले आहेत. यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या कलाकारांनी राज ठाकरेंना चित्रासोबत एखादे कॅप्शन लिहिण्याची सुद्धा विनंती केली. त्यावर, राज यांनी आता काय लिहू तुम्हीच सांगा? गप्प बसा असे लिहू का? असा प्रतिप्रश्न केला. ज्यानंतर उपस्थितांनी टाळ्या वाजवून राज यांना दाद दिली. “मला उभे राहून व्यंगचित्र काढायची सवय नाही, त्यामुळे अजित पवार जसे पाहिजे, तसे जमले नाहीत. मला बाळासाहेबांसारखीच एका जागी बसून व्यंगचित्र काढण्याची सवय आहे. म्हणून, जे आहे ते गोड मानून घ्या,” असे राज ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले.

सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असंख्य राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांच्या पदाच्या राजीनाम्याची 02 मे ला त्यांच्या “लोक माझा सांगाती…” या राजकीय जीवनचरित्र
प्रकाशनाच्यावेळी घोषणा केली. ज्यानंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्यांच्या या निर्णयाला उपस्थित कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी विरोध केला.

- Advertisement -

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवार यांची मनधरणी करण्यास आणि त्यांनी त्यांचा निर्णय मागे घेण्याची मागणी सुरू असतानाच त्यांच्या निर्णयाला अजित पवार यांनी पाठिंबा दिला. तर त्यावेळी त्यांचा सूर वेगळा लागत असल्याचे दिसून आले. ज्यानंतर अजित पवार हे शरद पवार यांना निर्णय मागे घेण्यास का सांगत नाहीयेत, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावेळी असलेले त्यांचे हावभाव हे राज ठाकरे यांनी त्यांच्या व्यंगचित्राच्या माध्यमातून रेखाटले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -