घरमहाराष्ट्रधोकादायक इमारत पाडायची कधी?

धोकादायक इमारत पाडायची कधी?

Subscribe

नालासोपाऱ्यातील धोकादायक इमारत पाडण्यासाठी महापालिका न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहात आहे. हा निर्णय आल्याशिवाय इमारत पाडली जाणार नसल्याने इमारतीला लागून असलेल्या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. पावसामुळे इमारतीचा भाग कोसळल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.

नालासोपाऱ्यातील धोकादायक इमारत पाडण्यासाठी महापालिका न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहात आहे. हा निर्णय आल्याशिवाय इमारत पाडली जाणार नसल्याने इमारतीला लागून असलेल्या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. पावसामुळे इमारतीचा भाग कोसळल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. नालासोपारा पूर्वेकडील तुळींज येथे सामवेदी ब्राम्हण समाजाची इमारत आहे. ही इमारत जुनी आणि धोकादायक असल्यामुळे रिकामी करण्यात आली. या इमारतीच्या बाजूने दुचाकी वाहने आणि रहिवाशांची विशेषतः विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. इमारतीशेजारी हॉस्पीटल असल्यामुळे वर्दळ असते. इमारत जीर्ण झाली असून पडझड सुरू झाली आहे. ही इमारत कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती आहे. याबाबत भाजपाचे पदाधिकारी मनोज बारोट यांनी आयुक्तांकडे तक्रार केली आणि इमारत जमीनदोस्त करण्याची मागणी केली. मात्र, इमारतीचे प्रकरण न्यायालयात असल्याने इमारत पाडता येणार नसल्याचे महापालिकेने बारोट यांना कळवले.

इमारत पाडण्यासंबंधी कोर्टातून स्थगिती आदेश

या इमारतीतील काही रहिवाशांनी इमारत पाडण्यासंबंधी कोर्टातून स्थगिती आदेश मिळवला आहे. त्यामुळे हा आदेश उठवण्यासाठी पालिकेने न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, त्यानंतर केवळ तारखाच पडल्याने पालिकेला इमारत जमिनदोस्त करता आलेली नाही. पालिकेच्या वकीलांनी न्यायालयात वस्तुस्थिती पुरेशी मांडली नाही. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य न्यायालयाच्या निदर्शनास आले नाही. परिमाणी निर्णयासाठी केवळ तारखा पडत गेल्या आहेत. ही इमारत पाडण्याची कारवाई टाळण्यामागे राजकारण असल्याचे बारोट यांनी सांगितले. वसईच्या साहाय्यक आयुक्त संध्या पाटील यांनी सांगितले की,’जमिनदोस्त करण्यासाठी आम्ही या इमारतीच्या जागेवर जाऊन पाहणी केली. त्यावेळी येथील काही रहिवाशांनी अंतर्गत वादामुळे कोर्टातून स्थगिती मिळवल्याची माहिती मिळाली. हा आदेश रद्द करण्यासाठी कोर्टात अर्ज करण्यात आला आहे. मात्र, त्यावर दोनदा तारखा पडल्या आहेत. कोर्टाच्या आदेशाशिवाय काहीही करता येणे शक्य नाही’.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -