घरताज्या घडामोडी‘अ‍ॅम्फोटेरिसीन’ आणि ‘टोसिलिझुमॅब’ वितरणासाठी शासनाने घेतला हा निर्णय

‘अ‍ॅम्फोटेरिसीन’ आणि ‘टोसिलिझुमॅब’ वितरणासाठी शासनाने घेतला हा निर्णय

Subscribe

कोरोनाचा धोका कायम असतांना कोरोनावर मात केलेल्या व्यक्तींना म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार बळावत चालला आहे. तसेच गंभीर कोव्हिड रुग्णांना उपयुक्त ठरणारे टोसिलिझुमॅब गेल्या अनेक दिवसांपासून मिळत नसल्याची स्थिती कायम असून या औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी तसेच औषध साठयाचे सुरळित वितरण व्हावे याकरीता शासनाने आता विभागनिहाय नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत.

कोविडनंतर अनेक रूग्णांना म्युकरमायकोसिसचा आजार बळावला. या आजारावर मात करण्यासाठी अ‍ॅम्फोटेरिसीन बी या औषधाला मोठया प्रमाणावर मागणी वाढली. नाशिक जिल्हयाचा विचार करता नाशिकमध्ये या आजाराचे ७१९ रूग्ण आढळून आले. यातील ५४१ रूग्णांनी या आजारावर मात केली तर सुमारे ४०० रूग्णांच्या गंभीर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सद्यस्थितीत अ‍ॅम्फोटेरिसीन बी या औषधाची ४० हजार व्हायलची मागणी असतांना केवळ १५ हजार व्हायल प्राप्त झाल्या आहेत. त्याचप्रमाणे गंभीर कोविड रूग्णांपैकी अनेकांना टोसिलिझुमॅबची गरज पडत आहे; परंतु ते वेळेवर मिळत नसल्याने डॉक्टरांची पंचाईत होत आहे. अनेक नातेवाईक मंडळी बाहेर गावाहून ते उपलब्ध करण्यासाठी कसरत करत आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता या औषधांचे वितरण योग्य प्रकारे व्हावे, यासाठी त्यांचे नियंत्रण करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाने नोडल अधिकार्‍यांची नेमणूक केलेली आहे. जिल्हा स्तरावर सदरील औषधांचे वितरण जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनाखाली करण्यात येते. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधण्यात यावा.

- Advertisement -

हे आहेत नोडल अधिकारी
दा.रा.गहाणे, सह आयुक्त (मुख्यालय), महाराष्ट्र राज्य, 9892832289; गौ.वा. ब्याळे, सह आयुक्त (औषधे) (बृहन्मुंबई), बृहन्मुंबई, 9892836216, वि.तु.पौनिकर, सह आयुक्त (औषधे) (कोकण विभाग), 9850272495, दुष्यंत भामरे, सह आयुक्त (औषधे) (नाशिक) नाशिक विभाग, 9820245816, एस.एस.काळे, सह आयुक्त (औषधे) (औरंगाबाद), औरंगाबाद विभाग, 9987236658, एस.बी.पाटील, सह आयुक्त (औषधे) (पुणे), 9326035767, अशोक बर्डे, सह आयुक्त (औषधे) (अमरावती), 9833445208, महेश गाडेकर, सह आयुक्त (औषधे) (नागपूर), 7709190076 यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -