घरमहाराष्ट्रकामगारांनी केली ई- वे बिल प्रणाली रद्द करण्याची मागणी

कामगारांनी केली ई- वे बिल प्रणाली रद्द करण्याची मागणी

Subscribe

मुख्यमंत्र्यांना साकडे

संपूर्ण देशात लागू झालेल्या वस्तू व सेवाकर अंतर्गत ई-वे बिल पद्धतीचा अवलंब शासनाकडून केला जात आहे. मात्र यातील जॉबवर्क ई-वे ही बिल प्रणाली भिवंडीतील लघू यंत्रमाग धारकांसाठी अन्यायकारक असल्याने ती तत्काळ रद्द करावी, अशी मागणी भाजपा भिवंडी शहर उद्योग आघाडीचे प्रमुख राकेश ओस्तवाल यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
मुख्यमंत्री ठाणे येथे कोकण पदवीधर मतदारसंघाच्या बैठकीसाठी आले असता खासदार कपिल पाटील व आमदार महेश चौघुले यांच्या नेतृत्वाखाली यंत्रमागधारकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना भेटून ई – वे बिलाबाबतच्या अडचणी मांडल्या. त्यावेळी राकेश ओस्तवाल यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले. यंत्रमाग व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळात राकेश ओस्तवाल, भवरलाल पालरेचा, रतीलाल सुमारीया, पुल्वराज डागरा, भरत पोरवाल, ललीत पोरवाल, अंकित संकलेचा आदी सहभागी झाले होते.

- Advertisement -

या भेटीत यंत्रमाग व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. भिवंडीत लघू यंत्रमाग व्यावसायिक जॉबवर्क करीत असून त्यांची भांडवल गुंतवणूक मर्यादित असल्याने त्यांच्यासाठी ही जॉबवर्क ई-वे बिल पद्धती अत्यंत अन्यायकारक आणि त्रासदायक असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. शहरात यंत्रमाग व्यवसायास पूरक असलेले डब्लिंग, ट्विस्टिंग, सायझिंग, डाईंग असे छोटे-छोटे व्यवसाय असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर कच्च्या मालाची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक केली जात असते. अशा वेळी प्रत्येक ठिकाणी जॉबवर्क ई – वे बिल सादर करणे जाचक केले असून त्यासोबतच वाहतूक करीत असताना ई – वे बिल सोबत असणे बंधनकारक केले आहे. मालाची वाहतूक करताना अनेकवेळा वाहन नादुरुस्त झाल्यावर सदरचा माल दुसऱ्या वाहनातून पोहचवावा लागत असतो. त्यामुळे ई – वे बिलाची अट लघू यंत्रमाग व्यावसायिकांना जाचक ठरत आहे.

गुजरात व तामिळनाडू येथिल सरकारने जॉबवर्क ई-वे बिल प्रणाली रद्द केली असून त्या धर्तीवर भिवंडीसह महाराष्ट्रातील यंत्रमाग व्यवसायास ‘अच्छे दिन’ येण्यासाठी राज्यातील जॉबवर्क ई – वे बिल प्रणाली रद्द करावी, अशी मागणी राकेश ओस्तवाल यांनी केली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -