घरताज्या घडामोडीउपमुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना लिहिली चिठ्ठी अन् चर्चेला उधाण

उपमुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना लिहिली चिठ्ठी अन् चर्चेला उधाण

Subscribe

शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून राज्याच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले जात आहे. परंतु अनेक भाषणांमध्ये आणि पत्रकार परिषदेत आपण पाहिलं असेल की, पहिल्यांदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषण करतात आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाषण करतात. परंतु भाषण करण्याच्या कालावधीत फडणवीस हे चिठ्ठीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना रसद पुरवण्याचे काम करतात. पत्रकार परिषद आणि कार्यक्रमातील किस्से आपण पाहिले असतील. दरम्यान, यावेळी सुद्धा सोलापुरात अशाच प्रकारचा एक किस्सा घडला. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना लिहिली चिठ्ठी आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

सोलापुरात काल रविवारी गुरव समाजाचे महाअधिवेशन होते. नागपूर येथील कार्यक्रम संपवल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही सोलापुरात येणार होते. ठरल्याप्रमाणे दोघांचेही सोलापुरातील शासकीय विश्रामगृहावर आगमन झाले आणि त्यांचा ताफा व्हीआयपी रोडवरून पुढे निघाला. महाअधिवेशनात प्रोटोकॉलप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रथम भाषण झालं. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे भाषण करण्यासाठी उभे राहिले.

- Advertisement -

जेव्हा मुख्यमंत्री भाषण करण्यासाठी उठले तेव्हा त्यांची फडणवीसांसोबत काही चर्चा झाली. त्या चर्चेनंतर एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरु असताना देवेंद्र फडणवीस यांनी एक चिठ्ठी लिहिली आणि ती चिठ्ठी पीएच्या माध्यमातून मुख्यमंत्री शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवली. त्यानंतर शिंदेंनी संत काशीबा युवा विकास योजनेची घोषणा करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्या योजनेचं स्वागत केलं. परंतु या प्रकारानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.


हेही वाचा : भूपेंद्र पटेल गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान; सलग दुसऱ्यांदा घेतली शपथ

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -