‘कोस्टल रोड’च्या दोन खांब्यातील अंतर पुरेसे; बोट दुर्घटना घडल्यास विमा संरक्षण

मुंबईतील विशेषतः पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना म्हणून ' कोस्टल रोड' प्रकल्प उभारण्यात येत आहे. मात्र या कोस्टल रोडच्या खांब्यामुळे मच्छीमार बोटिला अपघात होण्याची भिती व्यक्त करीत कोळी बांधवांनी त्यास विरोध केला होता.

मुंबईतील विशेषतः पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना म्हणून ‘ कोस्टल रोड’ प्रकल्प उभारण्यात येत आहे. मात्र या कोस्टल रोडच्या खांब्यामुळे मच्छीमार बोटिला अपघात होण्याची भिती व्यक्त करीत कोळी बांधवांनी त्यास विरोध केला होता. वरळी येथील ‘क्लिव्हलँड जेट्टी’मधून मच्छिमारांच्‍या बोटींना ये-जा करण्‍यासाठी समुद्रातील किनारी रस्‍ता प्रकल्‍पामधील पुलाच्‍या दोन पिलरमधील अंतर ६० मीटर ऐवजी २०० मीटर ठेवण्‍याची मागणी स्‍थानिक मच्छिमारांकडून करण्‍यात येत आहे.

मात्र ‘राष्ट्रीय समुद्री विज्ञान संस्था’ ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी’ ही समुद्र विषयक बाबींचा अभ्यास व संशोधन करणाऱ्या संस्थेच्या अहवालानुसार कोस्टल रोडच्या दोन खांब्यातील ६० मीटरचे अंतर अर्थात तब्बल २०० फूट एवढे अंतर पुरेसे असल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे.

यासंदर्भातील माहिती, ‘कोस्टल रोड’ प्रकल्पाचे प्रमुख अभियंता चक्रधर कांडलकर यांनी दिली आहे. त्यामुळे आता कोस्टल रोडच्या कामांना कोळी बांधवांकडून होणारा विरोध कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
तसेच या प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणाऱ्या खांबांना अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कवच अर्थात ‘फेंडर’ बसविण्यात येणार आहे. तसेच खांबावर बोट आदळून अपघात झाल्यास त्या दृष्टीने विमा कवच देखील घेण्यात येत आहे. विशेष म्हणजे हे विमा कवच पुढील वीस वर्षांसाठी असणार आहे, असे चक्रधर कांडलकर यांनी सांगितले.

मुंबई महापालिकेने ऑक्‍टोबर २०१८ पासून शामलदास गांधी मार्ग (प्रि‍न्‍सेस स्‍ट्रि‍ट) उड्डाणपूल ते राजीव गांधी कोस्टल रोड (वांद्रे वरळी सागरी सेतू) च्‍या वरळी टोकापर्यंत मुंबई कोस्‍टल रोड (दक्षिण) प्रकल्‍पाचे काम हाती घेतलेले आहे. हे काम सध्या प्रगतीपथावर असून आजपर्यंत प्रकल्‍पाचे ५३ टक्‍के काम पूर्ण झाले आहे. कोस्टल रोडचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.


हेही वाचा – दिल्लीच्या उपराज्यपालांचा तडकाफडकी राजीनामा, दिले ‘हे’ कारण