घरमहाराष्ट्र‘आनंदाचा शिधा’चे वितरण महिनाभर राहणार सुरु

‘आनंदाचा शिधा’चे वितरण महिनाभर राहणार सुरु

Subscribe

मुंबई : राज्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना “आनंदाचा शिधा” संचाचे वितरण २२ मार्च २०२३ गुढीपाडव्यापासून पुढील एक महिनाभर सुरु राहणार असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब, औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा, अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील एपीएल (केशरी) शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती इत्यादी सणांनिमित्त नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रत्येकी १ किलो रवा, १ किलो चणाडाळ, १ किलो साखर व १ लिटर खाद्यतेल या ४ शिधा जिन्नसांचा समावेश असलेला “आनंदाचा शिधा” संच उपलब्ध करुन देण्याचा निर्णय २२ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. त्यानुसार काही जिल्ह्यांत वितरण सुरू झाले आहे.

- Advertisement -

यापूर्वी सन २०२२ मधील दिवाळी सणानिमित्त ऑक्टोबर २०२२ ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना “आनंदाचा शिधा” संचाचे वितरण करण्यात आले होते, असे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

हेही वाचा – देश हुकूमशाहीच्या वाटेवर, पण आम्ही…; संजय राऊत यांचा केंद्रावर घणाघात

- Advertisement -

मागील वर्षी झाली सुरुवात
सर्वसामान्यांची दिवाळी गोड व्हावी तसेच नागरिकांना महागाईपासून दिलासा मिळावा याकरीता फक्त 100 रुपयांमधे प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि खाद्यतेल देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून मागील वर्षी दिवाळीमध्ये झाला होता. जिल्हयातील सात लाख लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने “आनंदाचा शिधा”ची सुरुवात करण्यात आली होती.

जाहिरातीवरच समाधान मानावे लागले
आपलीही दिवाळी गोड होईल या आशेने नागरिकांनी दुकानांमध्ये रेशन दुकाने गाठली. पण ग्राहकांना फक्त जाहिरातीवरच समाधान मानावे होते. कारण सरकारचा हा ”आनंदाचा शिधा” रेशन धान्य दुकानांपर्यंत पोहोचलाच नव्हता. ”आनंदाचा शिधा” हे किट कधी देणार अशी विचारणा शिधापत्रिकाधारकांकडून करण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -