घरमहाराष्ट्ररेमडेसिवीरच्या काळ्या बाजारावर जिल्हास्तरीय कंट्रोल रुम ठेवणार नजर

रेमडेसिवीरच्या काळ्या बाजारावर जिल्हास्तरीय कंट्रोल रुम ठेवणार नजर

Subscribe

खासगी रुग्णालयांमध्ये रेमडेसिवीरचा उपयोग योग्य पद्धतीने होतो की नाही याची तपासणी केली जाणार आहे.

राज्यात एकीकडे कोरोन संसर्ग अगदी वेगाने पसरत असून दररोज साठ हजाराहून जास्त रुग्ण सापडत आहेत. यामुळे राज्यातील अनेक रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन तुठवडा जाणवत आहे. असे असताना दुसरीकडे मात्र रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरु होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे अनेक रुग्णालयांमध्ये रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत असल्याने मेडिकल दुकानदार अगदी चढ्याभावाने या इंजेक्शनाचा काळाबाजार करत असल्याचे उघड झाले. या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्या आरोग्य विभाग प्रत्य़ेक जिल्हास्तरावर कंट्रोल रुम तयार करणार आहे. याबाबतच्या सुचना राज्य आरोग्य सेवा आयुक्तांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत.

रेमडेसिवीरच्या मागणी वाढत असल्याने खासगी दुकानदार जास्त किंमतीमध्ये इंजेक्शन विकत आहेत. याबाबतच्या अनेक तक्रारी राज्य आरोग्य विभागाकडे येत होत्या. त्यामुळे सध्या ऑक्सिजन कंट्रोल रुममध्ये रेमडेसिवीरबाबत स्वीकारल्या जाणार आहेत. या तक्रारी एफडीएम(FDA) कार्यालयामार्फत सोडवल्या जाणार आहेत. तसेच प्रत्येक जिल्हास्तरावर तांत्रिक समिती गठीत करत खासगी रुग्णालयांमध्ये रेमडेसिवीरचा उपयोग योग्य पद्धतीने होतो की नाही याची तपासणी केली जाणार आहे. तसेच गैरवापर होत असल्यास राज्यस्तरावरील FDA च्या कंट्रोल रुमकडून कारवाई केली जाणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्हात कंट्रोल रुम स्थापन केली जाणार असल्याची माहिती आहे.

- Advertisement -

सोलापूरात समिती गठीत

सोलापूर जिल्ह्य़ातील रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तक्रारी लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने समितीची घोषणा केली आहे. उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यांची समिती गठीत केली आहे. अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयात कंट्रोल रुम सुरु होणार आहे. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनच्या बॉटल्स थेट नष्ट न करता जिल्हा समितीला दाखवूनच नष्ट कराव्या लागणार आहेत. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -