‘चालकाने लोकेशन नीट सांगितले नाही त्यामुळे…’; विनायक मेटेंच्या अपघाताबाबत फडणवीसांचं मोठं वक्तव्य

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती निधनावर आज विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन सादर केले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अपघात कसा झाला? याबाबत माहिती दिली. तसेच, त्यानंतर मेटे यांच्या ड्रायव्हरची भूमिका, पोलिसांचे काम या सर्व गोष्टींबाबतही माहिती दिली.

Deputy Chief Minister a devendra fadanvis big announcement 7 thousand more police recruitment in Maharashtra

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती निधनावर आज विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन सादर केले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अपघात कसा झाला? याबाबत माहिती दिली. तसेच, त्यानंतर मेटे यांच्या चालकाची भूमिका, पोलिसांचे काम या सर्व गोष्टींबाबतही माहिती दिली. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. आज कॉंग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांनी विनायक मेटे यांच्या अपघाताबाबतचा लक्षवेदी मुद्दा उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी माहिती दिली. (The driver didnt tell the location properly so dcm Fadnavis big statement regarding Vinayak Mete accident)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी “विनायक मेटे यांच्या अपघातावेळी एक ट्रॉलर महामार्गाच्या शेवटच्या लेनमधून चालला पाहिजे होता. तो मधल्या लेनमधून चालत होता. त्यामुळे त्यांच्या चालकांना ओव्हरटेक करण्यासाठी जागा उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे काही काळ चालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि तो तिसऱ्या लेनमध्ये गेला. त्यावेळी त्यांच्यासमोर एक गाडी होती. या दोन गाड्यांच्यामधून मेटेंच्या चालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. हे चुकीचे होते. आणि थोड्याच वेळाच गाडीमध्ये ज्या बाजूला विनायक मेटे बसले होते, त्या बाजूला जबर धक्का बसला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला, असे डॉक्टरांनी सांगितले”, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

“आमदार विनायक मेटे यांच्या चालकाने 112 नंबरवर संपर्क साधून अपघाताची माहिती दिली होती. पण त्याने लोकेशन नीट सांगितले नाही. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी अपघाताच्या ठिकाणाचा बराच शोध घेतला. टनेलच्या दीड किलोमीटरपर्यंत पोलिसांनी पाहणी केली. मात्र त्यावेळी त्यांना अपघताचे ठिकाण सापडले नाही. चालकाला नीट लोकेशन सांगता आले नाही. कदाचित तो संभ्रमा अवस्थेत असावा. लोकेशन नीट कळले असते तर वेळेत मदत मिळू शकली असती”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली.

पोलिसांनी पुन्हा एक दीड तास शोध घेतला. फोन खरा की खोटा माहीत नाही. त्यानंतर रायगड पोलिसांना अलर्ट करण्यात आले. चालक भांबावलेला होता. त्यानंतर आयआरबीला सांगितले. आयआरबीची गाडी अवघ्या सात मिनिटात घटनास्थळी पोहोचली. त्यांनी विनायक मेटे यांना रुग्णालयात नेले. पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता की नाही चौकशीत निघेल. मृत्यू जागीच की हॉस्पिटलमध्ये जाताना झाला याची माहितीही चौकशीतून समोर येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


हेही वाचा – मध्य रेल्वे मार्गावरील एसी लोकलमुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठा फटका : जितेंद्र आव्हाड