घरताज्या घडामोडीड्रायव्हरला डुलकी लागली असावी आणि त्यातून हे घडलं : अजित पवार

ड्रायव्हरला डुलकी लागली असावी आणि त्यातून हे घडलं : अजित पवार

Subscribe

आजची पहाट सगळ्यांच्या दृष्टीकोनातून काळी पहाट झाली. दुर्देवाने रात्रभर प्रवास करून येत असताना ड्रायव्हरला कुठतरी डुलकी लागली असवी आणि त्यातून हे सगळं घडलंय, असे माझे स्वत:चे मत असल्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी म्हटले.

आजची पहाट सगळ्यांच्या दृष्टीकोनातून काळी पहाट झाली. दुर्देवाने रात्रभर प्रवास करून येत असताना ड्रायव्हरला कुठतरी डुलकी लागली असवी आणि त्यातून हे सगळं घडलंय, असे माझे स्वत:चे मत असल्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी म्हटले. अजित पवार यांनी विनायक मेटे यांच्या निधनानंतर नवी मुंबईच्या एमजीएम रुग्णालयात जाऊन चौकशी केली. (The driver must have taken a nap and this happened says opposition leader Ajit Pawar on vinayak mete death)

विनायक मेटे यांच्या निधनांनंतर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत करताना त्यांनी याबाबत भाष्य केले. “आजची पहाट सगळ्यांच्या दृष्टीकोनातून काळी पहाट झाली. दुर्देवाने रात्रभर प्रवास करून येत असताना ड्रायव्हरला कुठतरी डुलकी लागली असवी आणि त्यातून हे सगळं घडलंय, असे माझे स्वत:चे मत आहे. आम्ही सर्वे राजकीय क्षेत्रातील राजकीय नेते आहोत. खरेतर किंवा कुठल्याही क्षेत्रातील असलेल्या लोकांनी रात्री प्रवास करणे टाळले पाहिजेत. परंतु, वेळ महत्वाची असते, त्यामुळे ती टाळूनही चालत नाही”, असे अजित पवार यांनी म्हटले.

- Advertisement -

“त्यांच्या अपघातानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी येऊन गेले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सुतोवाच केले की, या अपघाताची चौकशी केली जाणार आहे. त्यानुसार त्यांनी ती करावी. त्यातूनच नेमके काय झाले याचे चित्र स्पष्ट होईल. कारण कंटेनर आणि कारचा वेग किती असतो याची माहिती आपल्या सर्वांना आहे”, असेही अजित पवार यांनी म्हटले.

शिवसंग्राम पक्षाचे नेते, विधानसभेचे माजी आमदार विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांच्या निधनानं मराठवाड्याचा कर्तृत्ववान सुपुत्र, मराठा चळवळीचं खंबीर नेतृत्वं हरपलं आहे. मी माझा निकटचा सहकारी गमावला आहे, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

- Advertisement -

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विनायकराव मेटे यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले असून महाराष्ट्राच्या सामाजिक प्रश्नांची जाण असलेलं, मराठा समाज आणि मराठवाड्याच्या विकासासाठी कार्यशील असलेलं त्यांचं नेतृत्वं होत. महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात प्रदीर्घ काळ सोबत असलेले ते माझे सहकारी होते. त्यांचं अकाली निधन हा महाराष्ट्रासाठी मोठा धक्का आहे, अशा शोकभावना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केल्या.


हेही वाचा – शेअर मार्केटमधील ‘बिग बुल’ राकेश झुनझुनवाला यांचे निधन

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -