घरमहाराष्ट्रअनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार; नागपुरातील त्यांच्या कॉलेजवर ईडीचे छापे

अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार; नागपुरातील त्यांच्या कॉलेजवर ईडीचे छापे

Subscribe

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत दिवसागणिक वाढ होत असून ईडीचे छापे अद्याप सुरु आहेत. शुक्रवारी देखील ईडीने अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील फेटरी येथील महाविद्यालयावर छापा टाकला. यासोबतच, ईडीनं नागपुरातल्या अनिल देशमुख यांच्याशी संबंधित इतर काही ठिकाणांवर देखील छापे टाकले. सकाळपासून ईडीची छापेमारी सुरु आहे.

ईडीने अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील तीन ठिकाणांवर छापे टाकले आहेत. सकाळपासून छापेमारी सुरु आहे. अनिल देशमुख यांचं काटोलजवळ फेट्री येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नावाचं इंजिनीअरिंग कॉलेज आहे. या कॉलेजवर देखील ईडीने छापा टाकला. या छापासत्रामध्ये अधिकाऱ्यांच्या चमूसोबतच राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडीही तैनात करण्यात आली आहे. अनिल देशमुख सध्या कुठे आहेत याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांना नाही, असं सांगितलं जातं आहे. त्या धर्तीवर अनिल देशमुख यांच्या कॉलेजवर आज मारलेला छापा हा त्यांच्यावरील कारवाईचा फास आवळला जात असल्याचे बोललं जात आहे.

- Advertisement -

अनिल देशमुख नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांचा मोठा मुलगा सलिल हा या संस्थेवर उपाध्यक्ष आहे. तर पत्नी आरती देशमुखही या संस्थेच्या पदाधिकारी असल्याची माहिती आहे. अनिल देशमुख यांचा पीए म्हणून अनेक वर्षे काम पाहत असलेला कुंदन शिंदे हा देखील या संस्थेवर पदाधिकारी आहे. कुंदन आणि दुसरे स्वीय सहायक संजीव पलांडे यांना या आधीच ईडीने अटक केली आहे.

- Advertisement -

माजी गृहमंत्री ‘नॉट रिचेबल’

अनिल देशमुख हे अज्ञातवास आहेत. त्यांचा ठावठिकाणा माहित नाही, असं ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. आमचा अनिल देशमुख यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. ते कुठे आहेत हे आम्हाला माहित नाही. त्यांचं नेमकं ठिकाण माहीत नाही. आम्ही आज सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहत आहोत. आम्हाला आशा आहे की आजच्या आदेशानंतर ते तपासाला सहकार्य करतील, असं ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचे आरोप केले आहेत. या आरोपांची सीबीआय आणि ईडी चौकशी करत आहे. ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी चारवेळा समन्स बजावलं. मात्र, एकदाही अनिल देशमुख चौकशीला उपस्थित राहिले नाहीत.

अनिल देशमुख पळून गेले – सोमैया

ईडीच्या छापेमारीनंतर भाजप नेते किरीट सोमैया यांनी प्रतिक्रिया देताना अनिल देशमुख पळून गेले, अशा शब्दात निशाणा साधला. “अनिल देशमुख आजपण ईडीच्या हाती नाही लागले. पळून गेले. काही लोकांना भीती आहे की विदेशात तर नाही निघून गेले. पण मी विश्वासाने सांगतो, आज, उद्या, परवा…ईडीच्या हाती लागणार आणि त्यांना जेलमध्ये जावं लागणार,” असं किरीट सोमैया म्हणाले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -