घरमहाराष्ट्रनिवडणूक आयोगाचा ठाकरे गटाला दणका, अडीच लाख प्रतिज्ञापत्रे केली बाद

निवडणूक आयोगाचा ठाकरे गटाला दणका, अडीच लाख प्रतिज्ञापत्रे केली बाद

Subscribe

निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नावासाठी ठाकरे गटाने केलेली अडीच लाख प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाने बाद ठरवली आहेत. ठाकरे गटाने तब्बल ११ लाक प्रतिज्ञापत्रे सादर केली होती. त्यापैकी अडीच लाख बाद करण्यात आल्याने ठाकरे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

खरी शिवसेना कोणाची हा वाद निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. याप्रकरणी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवलं आहे. शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह दोन्ही गटांना वापरता येणार आहे. याप्रकरणी सुनावणीत दोन्ही गटांनी ट्रकभरून प्रतिज्ञापत्रे सादर केली होती. यातील ठाकरे गटाने सादर केलेली अडीच लाख प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगाने बाद ठरवली आहेत. प्रतिज्ञापत्राचा फॉरमॅट चुकल्याने ही प्रतिज्ञापत्रे बाद करण्यात आले आहेत.

- Advertisement -

निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या विहीत नमुण्यामध्ये ही प्रतिज्ञापत्रे सादर करणे आवश्यक होते. मात्र, शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून विहीत नमुण्यामध्ये प्रतिज्ञापत्रे सादर न करण्यात आल्याने ही प्रतिज्ञापत्रे बाद करण्यात आली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -