घरताज्या घडामोडीनिवडणूक आयोग शिवसेनेचे नाव आणि चिन्ह आम्हाला देईल; शिंदे गटाच्या किरण पावसकरांना विश्वास

निवडणूक आयोग शिवसेनेचे नाव आणि चिन्ह आम्हाला देईल; शिंदे गटाच्या किरण पावसकरांना विश्वास

Subscribe

जे चाळीस आमदार आणि तेरा खासदार उठाव करत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर आले. त्यांना लाखो मतदारांनी निवडून आणले होते. त्यामुळे त्या मतदारांचा निवडणूक आयोग नक्कीच सत्कार करेल, म्हणजेच शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह आम्हाला देईल, असा विश्वास बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी व्यक्त केला.

जे चाळीस आमदार आणि तेरा खासदार उठाव करत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर आले. त्यांना लाखो मतदारांनी निवडून आणले होते. त्यामुळे त्या मतदारांचा निवडणूक आयोग नक्कीच सत्कार करेल, म्हणजेच शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह आम्हाला देईल, असा विश्वास बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी व्यक्त केला. (The Election Commission will give us Shiv Sena name and symbol Trust to Kiran Pavaskar of Shinde group)

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचे यावर आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. या सुनावणीपूर्वी ‘एबीपी माझा’ या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिंदे गटाचे प्रवक्ते यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, ठाकरे गटाचे वकील आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “त्यांचे वकिल न्यायालयाच्या चौकटीत एक वेगळे मत मांडतात आणि न्यायालयाबाहेर वेगळे मत मांडतात. न्यायालयात सांगतात वेळ लागू नये आणि बाहेर आल्यावर वेळ मागतात. मागच्या सुनावणीत त्यांच्या वकिलांनी सांगितले होते, शिवसेनेत फुट पडली नाही. आम्ही वेगळे झालेलो नाही. मग जे चाळीस आमदार आणि तेरा खासदार निघाले ते काय आहे, असे त्यांना विचारले पाहिजे. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर जे आमदार निवडणून आले, त्यांनी आपली साथ सोडली. मग ते कसे सांगतात की फुट पडलेली नाही”, असे किरण पावसकर यांनी सांगितले.

- Advertisement -

“ज्यावेळी हे आमदार बाहेर आले, त्याचवेळी शिवसेनेत फुट पडली. विचाराने आणि संख्याबळाने शिवसेनेतील आमदार वेगळे झाले आहेत. हे त्यांनी मान्य केले पाहिजे. त्यामुळे यांचे वकिल आपली वेगवेगळी भूमिका मांडत असतात. माध्यमांसमोर बोलत असताना स्वत:ला फेस सेव्हिंगसाठी वेगळे बोलतात आणि न्यायालयात वेगळी मतं मांडली जातात. जे चाळीस आमदार आणि तेरा खासदार उठाव करत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर आले. त्यांना लाखो मतदारांनी निवडून आणले होते. त्यामुळे त्या मतदारांचा निवडणूक आयोग नक्कीच सत्कार करेल, म्हणजेच शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह आम्हाला देईल”, असेही किरण पावसकर यांनी म्हटले.

“ठाकरे गटाच्या वकिलांनी मागच्या सुनावणीत आपली मते मांडली. उरलेली मतं ते आजच्या सुनावणीत मांडणार आहेत. त्यामुळे या सुनवाणीवेळी निकालाला वेळ लागण्याची शक्यता अधिक आहे. आजही आमचे (शिंदे गट) आणि त्यांचे (ठाकरे गट) वकिल निवडणूक आयोगात आपली बाजू मांडणार आहेत. त्यामुळे निकाल येण्यास वेळ लागू शकतो. त्यामुळे आजचं निकाल लागेल असे आजच्या वेळेनुसार दिसत नाही”, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – भारत जोडो यात्रेला ब्रेक, पठाणकोटहून राहुल गांधी पुन्हा दिल्लीत

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -