मुंबई : यंदा आधीच बिपरजॉय चक्रीवादळामुळे राज्यात मान्सून उशिराने दाखल झाला होता. त्यामुळे पेरण्याही उशिराने झाल्या. असे तसे करत शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आणि त्यानंतर काही प्रमाणात पाऊस बरसला. मात्र, महाराष्ट्रात मागील 34 ते 35 दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असून, त्यामुले पिके सूकत चालली आहेत. हे पिके वाचविण्यासाठी शेतकरी धडपड असल्याचे दिसून येत आहे. तर राज्यात यंदा मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल 22 टक्के तूट असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पुन्हा एकदा नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.(The eyes of the farmers are again towards the sky; Rain deficit in the state)ॉ
यंदा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्र पावसाने संपूर्ण देशात चांगलाच कहर केला होता. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात धो-धो बरसलेल्या पावसाने त्यांनतर गायब झालेला पाऊस पुन्हा परत फिरण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच देशातील काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 1 जूनपासून आत्तापर्यंत देशात सरासरीच्या 91 टक्के पाऊस झाला आहे. दरवर्षी 30 ऑगस्टपर्यंत देशात 687 मिमी सर्वसाधारणपणे पाऊस बरसत असतो. यावर्षी मात्र प्रत्यक्षात 627 मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. केरळसह महाराष्ट्रात पावसाची मोठी तूट असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
हेही वाचा : गोविंदानो, आता बिंधास्त चढवा थरावर थर सरकार आहे पाठीशी; विम्यासाठी 18 लाख मंजूर
मराठवाड्याची स्थिती गंभीर
यावर्षी पावसाने दिलेल्या उघडीपीमुळे मध्य महाराष्ट्रात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा रासरीच्या 22 टक्के पावसाची तूट पहायला मिळत असून, मराठवाड्यात 1 जूनपासून सरासरीच्या 19 टक्के पावसाची तूट पाहायला मिळत असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. त्यामुळे मराठवाड्यात पुन्हा एकदा यंदा पाणीबाणी होण्याची स्थिती आहे.
हेही वाचा : धारावी पुनर्विकासाचा प्रकल्प अदानी समूहालाचा मिळणार, सरकारने न्यायालयात मांडली बाजू
ऑगस्टमध्ये झाला केवळ 42 टक्के पाऊस
ऑगस्ट महिन्यांत सरासरीच्या केवळ 42 टक्के पाऊस झाला आहे. यामध्ये मराठवाड्याची स्थिती विदारक आहे. कारण, मराठवाडा विभागात केवळ 28 टक्के एवढाच पाऊस पडला आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणात 36 टक्के पाऊस पडला असून, राज्यातील 15 जिल्ह्यात यंदा मागील वर्षीच्या तुलनेत पावसाची तूट असून, हे 15 जिल्हे कोरड्या दुष्काळाच्या वाटेवर आहेत.
पिकं टाकू लागले माना
ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवल्यानंतर, सगळ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. पावसाअभावी शेतकऱ्यांची पिकं माना टाकू लागली आहेत. त्यामुळ आता पावसाची गरज आहे, अन्यथा पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊ शकते. तेव्हा याकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे असून, सर्वेक्षण करून मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.