घरमहाराष्ट्रएका वर्षात आरोग्य व्यवस्था उभी न करणं हे सरकारचं अपयश - संदीप...

एका वर्षात आरोग्य व्यवस्था उभी न करणं हे सरकारचं अपयश – संदीप देशपांडे

Subscribe

राज्यात कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झाला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर पुन्हा एकदा ताण आला आहे. मोठ्या प्रमाणात ऑक्सिज बेड, आयसीयू बेड, ऑक्सिजन सिलेंडर, रेमडेसिवीर इंजेक्शन तसंच संबंधीत औषधांचा तुटवडा जाणवत आहे. यावरुन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारव टीका केली आहे. एका वर्षात पर्याप्त आरोग्य व्यवस्था उभी न करणं हे सरकारचंच अपयश आहे, असं देशपांडे यांनी म्हटलं आहे.

संदीप देशपांडे यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली आहे. “गेले काही दिवस कोरोना रुग्ण वाढीसाठी फक्त जनतेला एकतर्फी दोष देण्याची स्पर्धाच लागली आहे. एका वर्षात पर्याप्त आरोग्य व्यवस्था उभी न करणं हे सरकारचेच अपयश आहे .जेव्हा सरकारमधील मंत्री एक बोट जनतेकडे दाखवतात, तेव्हा तीन बोटं त्यांच्याकडे आहेत हेसुद्धा त्यांनी विसरून चालणार नाही!” असं ट्विट संदीप देशपांडे यांनी केलं आहे.

- Advertisement -

मेडिकल सोडून इतर दुकानं सकाळी ७ ते ११ पर्यंतच सुरु

राज्यभरातील किराणा, भाजीपाला, दूध विक्री आदींची दुकाने बुधवारपासून सकाळी ७ ते ११ या वेळेत खुली राहणार आहेत. राज्य सरकारने मंगळवारी यासंदर्भातील आदेश जारी केला. मंगळवारी रात्री आठ वाजल्यापासून दुकानांच्या वेळेवर बंधन घालण्यात आले आहे. ते बंधन १ मेपर्यंत लागू राहणार आहे.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -