घरदेश-विदेशपाचव्या टप्प्याचा प्रचार संपला; राहुल गांधी, सोनिया गांधी, राजनाथ सिंह, स्मृती इराणी...

पाचव्या टप्प्याचा प्रचार संपला; राहुल गांधी, सोनिया गांधी, राजनाथ सिंह, स्मृती इराणी रिंगणात

Subscribe

लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी सकाळी सुरु होणार असून यात उत्तर प्रदेशमधील सर्वाधिक म्हणजे १४ जागांसाठी मतदान होणार आहे. यात लखनऊ, रायबरेली, अमेठी, फाझियाबाद, गोंढा, सीतापूर, बांदा आणि फतेपूर सारख्या मतदारसंघाचा समावेश आहे. उत्तर प्रदेशातील या लढतीपैकी सगळ्यांचे लक्ष हे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या मतदारसंघातील निवडणुकीवर लागले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर आता पाचव्या टप्प्यातील मतदान येत्या सोमवारी ६ मे रोजी होत आहे. प्रचाराची सांगता शनिवारी संध्याकाळी पाच वाजता झाली असून आता सर्वांचे लक्ष सोमवारच्या मतदानावर लागून राहिले आहे. पाचव्या टप्प्यात एकूण सात राज्यात ५१ जागांसाठी मतदान होणार आहे. बिहार (५),जम्मू काश्मीर (१), झारखंड (४), मध्य प्रदेश (७), राजस्थान(१२), उत्तर प्रदेश (१४) आणि पश्चिम बंगाल (७) अशा ५१ जागांसाठी हे मतदान होणार आहे. केंद्रीय राजकारणातील अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य यावेळी मतपेट्यांमध्ये बंद होणार आहे. ज्यात प्रामुख्याने राहुल गांधी आणि स्मृती इराणी, सोनिया गांधी, दिनेश सिंह आणि भाजपाचे राजनाथ सिंह यांचा समावेश आहे.
लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी सकाळी सुरु होणार असून यात उत्तर प्रदेशमधील सर्वाधिक म्हणजे १४ जागांसाठी मतदान होणार आहे. यात लखनऊ, रायबरेली, अमेठी, फाझियाबाद, गोंढा, सीतापूर, बांदा आणि फतेपूर सारख्या मतदारसंघाचा समावेश आहे. उत्तर प्रदेशातील या लढतीपैकी सगळ्यांचे लक्ष हे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या मतदारसंघातील निवडणुकीवर लागले आहे.

लखनऊ मतदारसंघातून ते दुसर्‍यांदा निवडणूक लढवित आहेत. भाजपातून काँग्रेसमध्ये गेलेले अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम सिन्हा या याठिकाणी समाजवादी पक्षातर्फे निवडणूक लढवित आहेत. त्याचबरोबर रायबरेली या मतदारसंघातून काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी हे पाचव्यांदा निवडणूक लढवित आहेत. त्यांच्याविरोधात यंदा सपा आणि बसपाकडून उमेदवार न दिल्याने भारतीय जनता पार्टीचे दिनेश सिंग यांच्यात सरळ लढत होणार आहे. मुख्य म्हणजे, देशभरातील सर्वांचे लक्ष लागलेल्या अमेठी मतदारसंघासाठी देखील सोमवारी निवडणूक होणार आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यात लढत होणार आहे. २०१४ साली या मतदारसंघातून इराणी यांनी विजय मिळवून काँग्रेसच्या राहुल गांधी यांना पराभवचा धक्का दिला होता. त्यामुळे यंदा या जागी कोणाचा विजय होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तर भाजपाच्या माजी खासदार सावित्रीबाई फुले हे देखील या पाचव्या टप्प्यातील लढतीतील आर्कषणाचे केंद्रबिंदू आहेत. भाजपाला रामराम ठोकत सावित्रीबाई यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून सध्या ते काँग्रेसच्या तिकीटावर आपले नशीब आजमविणार आहेत.

- Advertisement -

पाचव्या टप्प्यात होणार्‍या या निवडणुकीच्या आकडेवारीवर नजर टाकली असता एकूण ५१ मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. सात राज्यात होणार्‍या या निवडणुकीसाठी एकूण ६७४ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. देशभरातील एकूण ९६ हजार ८८ मतदान केंद्रावर सोमवारी निवडणूक होणार असून एकूण ८ कोटी ७५ लाख ८८ हजार ७२२ मतदारांनी या निवडणुकीसाठी नोंदणी केली आहे. तर पाचव्या टप्प्यात सर्वाधिक मतदान हे उत्तर प्रदेशातील एकूण १४ जागांसाठी होणार आहे. ज्यात एकूण १८२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून २८ हजार ७२ मतदान केंद्रावर निवडणूक होणार आहे. दरम्यान, मुंबईसह देशभरात वाढते तापमान हे उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. वाढत्या तापमानाचा थेट फटका निवडणुकीवर बसण्याची शक्यता असल्याने मतदारांना मतदानासाठी घराबाहेर काढणे हे प्रमुख आवाहन उमेदवारांसमोर असणार आहे.

पाचव्या टप्प्यात होणार्‍या या निवडणुकीत जम्मू काश्मीर येथील अनंतनाग या मतदारसंघात वेगळाच विक्रम घडला आहे. या मतदारसंघात तिसर्‍या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात निवडणूक होत असून देशभरातील अशा प्रकारे निवडणूक होणारे हे एकमेव राज्य असणार आहे. अनंतनाग या मतदारसंघात चार जिल्ह्यांचा समावेश असून त्यात अनंतनाग, कुलगाम, शोपियान आणि पुलवामा या जिल्ह्यांचा समावेश आहे. यातील पुलवामा, लेह, कारगील याठिकाणी ६ मे रोजी मतदान होणार आहेत. या मतदारसंघात एकूण १८ उमेदवार निवडणूक लढवित आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -