Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र आरक्षणाचा लढा कायम राहीलच, परंतु...; जरांगेंच्या तब्येतीबाबत रोहित पवारांना चिंता

आरक्षणाचा लढा कायम राहीलच, परंतु…; जरांगेंच्या तब्येतीबाबत रोहित पवारांना चिंता

Subscribe

मुंबई : मराठा आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे पाटील हे गेल्या 15 दिवसांपासून आपल्या सहकाऱ्यांसह बेमुदत उपोषणाला बसले आहेत. दोन दिवसांपूर्वी औषधपाण्याचाही त्याग केल्याने मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळत चालली आहे. गावकऱ्यांच्या विनंतीनंतर जरांगे पाटील यांनी औषधोपचार घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्यांच्या ढासळत चाललेल्या प्रकृतीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे.

- Advertisement -

जालन्यातील अंतरवाली सराटी येथे 1 सप्टेंबर 2023 रोजी पोलिसांकडून मराठा आरक्षणासाठी बसलेल्या आंदोलकांवर अमानुषपणे लाठीमार करण्यात आला. त्याबद्दल राज्यभरातून पडसाद उमटत आहेत. राज्य सरकारकडून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, या भूमिकेवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. तर सरकारने यासाठी महिन्याभराचा कालावधी मागितला आहे. या पार्श्वभूमीवर काल, सोमवारी सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती सर्व पक्षांच्या नेत्यांकडून करण्यात आली.

हेही वाचा – मोदींनी जग जिंकून काय फायदा? मराठा आरक्षणावरून ठाकरे गटाचा मुख्ममंत्र्यांवर निशाणा

- Advertisement -

तर, आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत, उपोषण मागे घेण्याचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन केले आहे. मनोज जरांगे पाटील अत्यंत तळमळीने, जिद्दीने उपोषण करत आहेत. त्यांची प्रकृती खालावत असल्याचे त्यांच्या आवाजावरून जाणवत आहे. तसेच त्यांची एक किडनी सुद्धा काम करत नाही. परिणामी उपोषण सुरू ठेवणे मनोज जरांगे पाटील यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – विनंतीनंतर मध्यरात्री घेतले जरांगे पाटलांनी सलाइन; आज करणार निर्णय जाहीर

आरक्षणाचा लढा कायम राहीलच, परंतु मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या खऱ्या आणि नि:स्वार्थी हिऱ्याचे आरोग्य धोक्यात आले तर समाजाचे खूप मोठे नुकसान होईल. त्यामुळे तूर्तास तरी समाजाचा आणि कुटुंबाचा विचार करून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यायला हवे. सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी, कौटुंबिक-मित्र परिवारासह सर्वांनीच उपोषण सोडण्यासाठी त्यांना साद घालावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

- Advertisment -