ST workers strikes : एसटी कर्मचाऱ्यांना आज शेवटचा अल्टीमेटम, निलंबन रद्द करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात

ST Worker strike anil parab appeal ST workers should return to work by March 10

गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांकडून विलिनीकरणाच्या मागणीला जोर धरत आहे. राज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ करण्यात आली आहे. परंतु काही कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाच्या मागणीसाठी संप केला आहे. एसटी बंद असल्यामुळे अनेक शहरापेक्षा ग्रामीण भागात अनेक प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे पत्रकार परिषद घेत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सोमवार पर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना अल्टीमेटम दिला होता. आता जे कर्मचारी कामावर पुन्हा एकदा रूजू होत आहेत. त्यांचे निलंबन रद्द करण्याच्या प्रक्रियेला महामंडळाकडून सुरूवात झाली आहे.

अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आतापर्यंत जवळपास २१ हजार ३५ कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. तर आज संध्याकाळपर्यंत हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उच्च न्यायालयाने संपकऱ्यांच्या मागणीवरून राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन केली आहे. या समितीकडून सर्व संघटना, संपकरी आणि राज्य सरकारचे मत घेऊन हा अहवाल मुख्यमंत्र्यांकेड सादर केला जाणार आहे. त्यानंतर हा अहवाल न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. या अहवालात विलिनीकरण शक्य आहे की नाही यावर चर्चा करण्यात येईल. त्यानंतर २० डिसेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीत विलिनीकरणाचा निर्णय होईल. असा संभ्रम काही एसटी कर्मऱ्यांमध्ये संपकरी नेत्यांकडून परसवला जात आहे. असं अनिल परब म्हणाले.

जे एसटी कर्मचारी कामावर हजर होत आहेत. त्यांचे निलंबन मागे घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. राज्यभरात काल (रविवार) एकूण २ हजार १९९ बस रस्त्यांवर धावल्या तर १२२ आगारांच्या कामकाजाला सुरूवात देखील झाली आहे. दरम्यान, समितीचा अहवाल विलिनीकरणाच्या बाजूने आल्यास राज्य सरकार समितीचा निर्णय मान्य करेल. परंतु आज एसटी आणि बसगाड्या सुरू करण्याची गरज आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा कामावर रूजू व्हावे, असे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे.परंतु जे कर्मचारी कामावर रूजू होणार नाहीत. त्यांच्यावर मेस्मा कायदा लागू करण्याची शक्यताही परिवहन मंत्र्यांनी वर्तवली आहे.

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांचं नुकसान व्हावं अशी राज्याची भूमिका आणि इच्छाही नाहाये. परंतु संप मागे घेतला जात नसल्यामुळे आतापर्यंत केवळ प्रशासकीय प्रक्रियेचा भाग म्हणून कारवाई केली आहे. परंतु सोमवार पर्यंत निलंबन झालेल्या आणि न झालेल्या अशा सर्व कर्मचाऱ्यांनी कामावर पुन्हा हजर रहावे. तसेच जे कर्मचारी कामावर हजर राहतील. त्यांच्यावरील निलंबन प्रक्रिया मागे घेतली जाईल. असं भावनिक आवाहन अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांनी दिलं होतं. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचा आकडा २१ हजारांच्या वर गेला असून संध्याकाळपर्यंत हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.


हेही वाचा : ‘हिंदू असून हिंदुत्ववादी नसेल तर तो खोटा हिंदू’, अनिल विज यांचा राहुल गांधींवर