घरमहाराष्ट्रराज्यातील सर्वच महापालिकांची आर्थिक स्थिती गंभीर

राज्यातील सर्वच महापालिकांची आर्थिक स्थिती गंभीर

Subscribe

कोरोनामुळे पुण्यासह राज्यातील सर्वच महापालिकांची आर्थिक स्थिती गंभीर झाली आहे. राज्य सरकार शक्य तेवढी मदत महापालिकांना करत आहेत. आम्ही केंद्राकडे निधीची मागणीही करत आहोत. कोरोना रोखण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही प्रत्येक वॉर्डमध्ये कोविड दक्षता समिती स्थापन करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील लोकप्रतिनिधींच्या बैठकीत दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील विधान भवनात गुरुवारी बैठक झाली. या बैठकीला सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबईत सुरुवातीच्या काळात सर्वाधिक रुग्ण वाढत होते. तेथील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, तातडीने टास्क फोर्स स्थापन केल्याने परिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत झाली आहे. तसेच वाढत्या रुग्ण संख्येमुळे काही गोष्टींची कमतरता होती. मात्र त्याची पूर्तता करण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्हेंटिलेटरची मागणी खूपच होती. त्यानुसार मागणी केल्याप्रमाणे केंद्राकडून व्हेंटिलेटर्स आले आहेत.

- Advertisement -

सुरुवातीच्या काळात मुंबई आणि पुण्यातच कोरोनाचे रुग्ण आढळत होते. आता राज्यातील अनेक भागांत आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार प्रत्येक जिल्ह्याला सर्वतोपरी मदत करीत आहे. राज्यातील कोरोनाच्या संसर्गाची पहिली लाट संपलेली नसून आणखी किती लाट येईल याबाबत माहिती नाही. मात्र, आता आपल्याला कोरोनासोबत जगायला शिकलं पाहिजे, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत शहरातील लोकप्रतिनिधींसमोर मांडली.

कोरोना संकटाच्या काळात लोकप्रतिनिधी आणि प्रशासनामध्ये समन्वय पाहिजे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेता, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार हे पुण्याचेच आहेत. त्यामुळे स्वत: अजितदादांचे पुण्याच्या परिस्थितीवर लक्ष असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -