नाशिक : मालेगाव महापालिकेमार्फत शहरातील सर्व नागरिकांना महापालिका प्रशासनातर्फे सूचित करण्यात आले आहे की, दि. १ व ३ सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा होणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी १ सप्टेंबरपासून दिवसाआड होणार्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे. अल-निनो समुद्र प्रवाह सक्रियतेमुळे महाराष्ट्रात सद्या सर्वच ठिकाणी कमी पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झालेली आहे.
मालेगाव शहरास पाणीपुरवठा करणार्या गिरणा धरण व चणकापूर धरणाचे पाणलोट क्षेत्रातही अत्यल्प पावसामुळे धरणातील पाणीसाठा हा मर्यादीत आहे. त्यामुळे मालेगाव शहरात पाणीटंचाई सदृष्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंत परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. चणकापूर धरण आणि गिरणा धरणातील मालेगाव शहरासाठी आरक्षित असलेला मर्यादीत पाणी साठा हा ऑक्टोबर अखेर पर्यंत पुरवण्यासाठी मालेगाव महापालिकेस कटीबध्द नियोजन करणे व त्या नियोजनानुसार मालेगाव शहराचा पाणीपुरवठा हा दोन दिवसाआड करणे अनिवार्य झाले आहे. त्यामुळे दि. 1 सप्टेंबरपासून मालेगाव शहराचा पाणीपुरवठा हा दोन दिवसाआड करण्यात येत आहे.
शहरातील ज्या नळधारकांनी नळांना तोट्या लावलेल्या नाहीत त्यांनी तात्काळ आपल्या नळांना तोट्या लावून घेणे. जे नागरीक नळ आल्यावर आपल्या घरासमोर, रोडवर व गटारीत पाणी सोडून देतात तसेच स्वत:ची वाहने धुवत असतात असे निदर्शनास आल्यास संबंधितांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. तरी 1 सप्टेंबरपासून शहरात या झोनमध्ये दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.
मोठी कॅम्प पंपींग, निहालनगर जलकुंभ, पाच लाख जलकुंभ, विजयवाली पंपींग, क्वॉटेज झोन, सर सैय्यद (पार्ट 2), आझाद नगर उत्तर जलकुंभ, सायने जलकुंभ, निहाल नगर (पार्ट 2) जलकुंभ, संगमेश्वर मेन जलकुंभ, म्हाळदे घरकुल जलकुंभ, निहाल नगर (जुनी) मेन जलकुंभ, निहाल नगर (नविन) जलकुंभ तसेच दि. २ ऑक्टोबर रोजी तीन लाख जलकुंभ, कॅम्प जलकुंभ सोयगाव हद्दवाढ, रविवार वॉर्ड जलकुंभ, रजापुरा जलकुंभ, आझादनगर दक्षिण जलकुंभ, संगमेश्वर पार्ट जलकुंभ, सर्व्हे नं.119/120 जलकुंभ, दरेगाव गावठान जलकुंभ, न्यू बस स्टॅण्ड (अप्सरा) जलकुंभ, क्वॉटेज झोन (पार्ट 2) जलकुंभ, मोतीबाग नाका जलकुंभ, बाग ए महेमुद जलकुंभ, सर सैय्यद मेन जलकुंभ, छोटी कॅम्प सोयगाव गावठान या भागात पाणीपुरवठा बंद असेल.
तसेच रविवारी (दि. 3) रोजी पाच लाख (पार्ट 2) जलकुंभ अंतर्गत येणारे झोन, रविवार (पार्ट 2) जलकुंभ अंतर्गत येणारे झोन, गुलाब पार्क जलकुंभ अंतर्गत येणारे झोन, जैन स्थानक जलकुंभ अंतर्गत येणारे झोन, न्यू आझाद नगर (71 एमएलडी बायपास) जलकुंभ अंतर्गत येणारे झोन, गुलाब पार्क (पार्ट 2) जलकुंभ अंतर्गत येणारे झोन, पॅराडाईज जलकुंभ अंतर्गत येणारे झोन, शफी पार्क जलकुंभ अंतर्गत येणारे झोन, म्हाळदे गाव जलकुंभ अंतर्गत येणारे झोन, निहाल नगर (नवीन) जलकुंभ अंतर्गत येणारे झोन, शिव नगर जलकुंभ अंतर्गत येणारे झोन, निहाल नगर (जुनी) जलकुंभ अंतर्गत येणारे झोन, क्वॉटेज झोन जलकुंभ अंतर्गत येणारे झोन, भायगाव गावठाण व शिवार अंतर्गत येणारे झोन, विजयवाली पंपींग अंतर्गत येणारे झोन येथे पाणीपुरवठा बंद असेल. त्यामुळे नागरिकांनी वरील बाबी विचारांत घेवून, पाणीपुरवठ्याबद्दल नोंद घेवून सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.