Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Bank Holiday: मे महिन्यात लवकर उरकून घ्या बँकिंगची कामे, 'एवढेच' दिवस होणार...

Bank Holiday: मे महिन्यात लवकर उरकून घ्या बँकिंगची कामे, ‘एवढेच’ दिवस होणार कामकाज

Subscribe

मुंबई | आर्थिक वर्ष २०२३-२४ पहिला महिना संपत आला आहे. आणि मे महिना सुरु होण्यासाठी अवघा आठवडा शिल्लक राहिला आहे. यापूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) मे (May) महिना सुरू होण्यापूर्वीच बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. सर्व सामान्यांच्या जीवनात बँक हा अविभाज्य भाग आहे. नागरिकांना पैशांचे व्यवहार, डिमांड ड्राफ प्राप्त करणे, चेक जमा करणे आदी कामांसाठी बँकेची आवश्यकता असते. तसेच बँकांना सुट्टी ( Bank Holiday) असेल तर सर्व सामान्यांची अनेक कामे रखडतात.

जर तुम्हाला मे महिन्यात महत्त्वाचे काम करायचे असेल तर तुम्हाला बँकेला कधी सुट्टी असणार आहे. याबद्दल तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. मे महिन्यात बँकांना जास्त सुट्ट्या आहेत. मे महिन्यात सण, जयंती आदी कारणांमुळे बँकांना एकूण १२ सुट्ट्या आहेत. यात शनिवार आणि रविवार देखील बँकांना सुट्ट्या आहेत. मे महिन्यात महाराष्ट्र दिन, महाराणा प्रताप जयंती आणि बुद्ध पौर्णिमा असे अनेक महत्वाचे दिवस आहेत. यामुळे मे महिन्यात राज्यातील अनेक दिवस बँकांचे कामकाज बंद असणार आहे.

- Advertisement -

अशी आहे मे महिन्यातील बँकांच्या सुट्टीची यादी

१ मे २०२३ – महाराष्ट्र दिन/ मे दिनानिमित्त बेलापूर, गुवाहाटी, बेंगळुरू, हौदराबाद, कोलकाता, कोच्ची, मुंबई, पणजी, नागपूर, पाटणा आणि त्रिवेंद्रम येथील बँका बंद राहणार आहेत.

- Advertisement -

५ मे २०२३ – बुद्ध पौर्णिमानिमित्ताने बेलापूर, आगरतळा, चंदीगड, भोपाळ, डेहराडून, जम्मू, कोलकाता, कानपूर, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, श्रीनगर आणि शिमला या दिवशी बँका बंद राहतील.

७ मे २०२३ – रविवार असल्यामुले देशभरातील सर्व बँका बंद असणार आहेत.

९ मे २०२३ – रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्ताने कोलकातामधील सर्व बँका बंद असणार आहेत.

१३ मे २०२३ – मे महिन्यातील दुसरा शनिवार असल्यामुळे देभरातील बँका बंद राहणार आहे.

१४ मे २०२३ – रविवारमुळे देशभरातील सर्व बँका बंद राहणार आहेत.

१६ मे २०२३ – सिक्कीममध्ये राज्य दिनानिमित्ताने बँका बंद असणार आहेत.

२१ मे २०२३ –  देशभरातील बँकांना रविवार असल्यामुळे सुट्टी असेल.

 

- Advertisment -