घरमहाराष्ट्रआपलेच घोटाळे बाहेर काढणारा पहिलाच विरोधी पक्ष, फडणवीसांची मिश्कील टिप्पणी

आपलेच घोटाळे बाहेर काढणारा पहिलाच विरोधी पक्ष, फडणवीसांची मिश्कील टिप्पणी

Subscribe

TET Scam | ज्यांनी सभात्याग केला त्यांनी टीईटी घोटाळा का झाला, लाखो विद्यार्थ्यांचं स्वप्न चिरडण्याचं काम कोणी केलं? अपात्र कंपनीना पात्र कोणी केलं? यावर चर्चा केली पाहिजे. त्यावर हे आरोप लावा. त्यामुळे पुन्हा सांगतो सत्ताराच्या मुलीला नोकरी मिळाली नाही, असं फडणवीसांनी पुढे स्पष्ट केलं.

नागपूर – महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीईटी परीक्षेत गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. यावरून हिवाळी अधिवेशनात वादळी चर्चा झाली. याप्रकरणी विरोधकांनी पायऱ्यांवर उतरत सत्तारांच्या राजीनाम्याची मागणीही केली. दरम्यान, स्वतःच्याच काळातील घोटाळे बाहेर काढणारा हा पहिलाच विरोधी पक्ष असल्याची मिश्किल टिप्पणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

टीईटी घोटाळ्याप्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत प्रश्न छेडला. मात्र, याविषयावर चर्चा करण्यास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी परवानगी दिली नाही. त्यामुळे सभागृहात बोलू दिले जात नसल्याचं सांगत विरोधी पक्ष सभात्याग करत असल्याचं आमदार जयंत पाटील यांनी घोषित केले.

- Advertisement -

हेही वाचा – ग्रामीण भागात शाळा व महाविद्यालयांच्या वेळेत एसटी धावणार; शंभूराज देसाई

दरम्यान, विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण दिलं. राहुल नार्वेकरांनी जो निर्णय दिला तो योग्य आहे असं सांगत टीईटी घोटाळा महाविकास आघाडीच्याच काळात झाला असं फडणवीस म्हणाले. राज्यातील लाखो लोकांच्या नोकऱ्या घालवणारा घोटाळा यांच्या काळात झाला. त्यावेळी सरकार काय करत होतं?
या राज्यातील लाखो तरुणांना बुडवणारा घोटाळा महाविकास आघाडीच्या काळात झाला. सनदी अधिकाऱ्यांपासून सगळे लोक यात लिप्त होते. यांच्या काळात झालेल्या टीईटी घोटाळ्याच्या तार मंत्रालयात गेले. मंत्रालयातील अधिकारी अटकेत गेले. सत्तारांच्या कोणत्याही मुलींना टीईटी अंतर्गत नोकरी लागलेली नाही. कोणत्याही मंत्र्यांवर बेछुट आरोप लावायचे आणि निघून जायचं, असं विरोधकांचं धोरण आहे. त्यांना तसंच उत्तर देऊ. मला तर आश्चर्य वाटतं की हा पहिला विरोधी पक्ष असेल जो स्वतःच्या काळातील घोटाळा बाहेर काढत आहेत. बॉम्ब बॉम्ब म्हणाले पण लवंगी फटाकेही नाही सापडले, असा हल्लाबोल फडणवीसांनी केला.

- Advertisement -

ज्यांनी सभात्याग केला त्यांनी टीईटी घोटाळा का झाला, लाखो विद्यार्थ्यांचं स्वप्न चिरडण्याचं काम कोणी केलं? अपात्र कंपनीना पात्र कोणी केलं? यावर चर्चा केली पाहिजे. त्यावर हे आरोप लावा. त्यामुळे पुन्हा सांगतो सत्ताराच्या मुलीला नोकरी मिळाली नाही, असं फडणवीसांनी पुढे स्पष्ट केलं.

हेही वाचा लोकपाल कायद्यासारखं लोकायुक्त विधेयक मंजूर करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य, फडणवीसांकडून आभार

तसंच, शिक्षक पात्रता परीक्षा (TET) घोटाळा अपात्र कंपन्यांना पात्र केल्याने झाला आहे. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, यामध्ये दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -