‘समृद्धी’चा २१० किमीचा पहिला टप्पा वाहतुकीसाठी सज्ज; 2 मे रोजी मुख्यमंत्री करणार उद्धाटन

महाराष्ट्राचा महत्वाकांशी असलेला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे. मुंबई ते नागपूर असा 701 किलोमीटरचा असलेल्या या महामार्गाचा पहिल्या टप्प्याचे म्हणजे 210 किलोमीटरच्या टप्प्याचे काम पूर्ण झालं आहे.

महाराष्ट्राचा महत्वाकांशी असलेला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे. मुंबई ते नागपूर असा 701 किलोमीटरचा असलेल्या या महामार्गाचा पहिल्या टप्प्याचे म्हणजे 210 किलोमीटरच्या टप्प्याचे काम पूर्ण झालं आहे. येत्या २ मे रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या महामार्गाचे उद्धाटन करणार आहेत. त्यानंतर प्रवाशांना महामार्गावर वाहन चालवता येणार आहे.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी अंतिम पाहाणी केली. या पाहाणी दौऱ्यानंतर त्यांनी नागपूर – शिव मडका ते शेलू बाजार – वाशिम जिल्हा इथपर्यंतचा २१० किलोमीटरचा टप्पा पुर्ण झाला असल्याचं सांगितलं. तसंच, या पहिल्या टप्प्याचे दोन मे रोजी उद्घाटन करण्याची घोषणाही सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केली.

समृद्धी महामार्ग या प्रकल्पासाठी जवळपास 55 हजार कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे. हा महामार्ग 10 जिल्हे, 26 तालुके, 392 गावांमधून जाणारा आहे. त्यातील आता नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम या जिल्ह्यांना जोडणारा पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला होणार आहे. तसंच, जून 2023 पर्यंत संपूर्ण महामार्गा वाहतूकीसाठी खुला होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

जगातील तिसऱ्या क्रमांकाचा हा महामार्ग असून मुंबई ते नागपूर हे अंतर पार करण्यासाठी आधी 14 तास लागत होते. मात्र हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर अवघ्या सात ते आठ तासात प्रवास करता येणार आहे. तसंच, 120 किमी प्रतीताश वाहतुकीचा वेग ठेवता येणार आहे. त्यामुळं प्रवाशांचा प्रवास सुसाट होणार आहे.

मुंबई ते नागपूर 1213 रुपये टोल

या समृद्धी महामार्गावर मुंबईच्या एन्ट्री पॉइंट आणि नागपूरच्या एन्ट्री पॉइंट इथे टोल नाके असणा आहेत. त्यामुळं मुंबईवरून या महामार्गावरून प्रवास करायचा असल्यास सुरूवातीलाच टोल भरावा लागणार आहे. त्यानंतर थेट नागपूर गाठता येणार आहे. मात्र हा महामार्ग अनेक जिल्ह्यांना जोडला गेला असल्यानं प्रत्येक जिल्ह्याच्या सिमेवर टोल नाके असणार आहेत. त्यामुळं प्रवासी माहामार्गावरून थेट नागपूरला जायच्या ऐवजी इतर ठिकाणी कुठे उतरल्यास तेवढ्या प्रवासाचा टोल भरावा लागणार आहे. कार, जीप, व्हॅन किंवा हलक्या वाहनांसाठी प्रतिकिलोमीटर 1.73 रुपये टोल आकारला जाणार आहे. नागपूर ते मुंबई असा कारने प्रवास केला तर या महामार्गावर 1213 रुपये टोल भरावा लागणार आहे.

“मुंबई नागपूर महामार्गाचा पहिल्या टप्प्यांचं उद्घाटन होतं आहे. पुढच्या तीन महिन्यात नागपूर ते शिर्डी महामार्ग सुरु करण्याचा इरादा सरकारचा आहे. संपूर्ण महामार्ग 2023 साली सुरू होईल. तसेच उद्घाटन म्हटले की, श्रेयवाद आलाच आमंत्रण निमंत्रणावरून नाराजी आलीच. मेट्रोच्या कार्यक्रमात याआधी आपण काही नाराजीनाट्य पाहिली आहेतच त्यामुळे विकासकामांसाठी सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे”, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

शिव मडका म्हणजेच समृद्धी महामार्गाचा नागपूरचा एन्ट्री पॉइंट ते वाशीम जिल्ह्यातील शेलूबाजार असा २१० किलोमीटरचा मार्ग पहिल्या टप्प्यात वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढील महामार्ग सुरू करण्याचा विचार असल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) उपाध्यक्ष राध्येशाम मोपलवार यांनी सांगितलं.


हेही वाचा – मातोश्रीच्या नादाला लागाल तर गोवऱ्या स्मशानात रचून या; राऊतांचा धमकीवजा इशारा