Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMahayuti Govt : महायुतीच्या सत्तेचे सूत्र दिल्लीत ठरणार; अमित शहा यांच्यासोबत गुरुवारी...

Mahayuti Govt : महायुतीच्या सत्तेचे सूत्र दिल्लीत ठरणार; अमित शहा यांच्यासोबत गुरुवारी बैठक

Subscribe

राज्यपालांकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा करण्यापूर्वी महायुतीत सत्तेचे सूत्र निश्चित होणार असून त्यासाठी गुरुवारी नवी दिल्लीत भाजप नेते अमित शहा यांच्या उपस्थितीत महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत खातेवाटप आणि मंत्र्यांची संख्या निश्चित केली जाणार आहे.

मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून माघार घेतल्याने महायुतीचा सरकार स्थापनेतील अडथळा दूर झाला आहे. राज्यपालांकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा करण्यापूर्वी महायुतीत सत्तेचे सूत्र निश्चित होणार असून त्यासाठी गुरुवारी नवी दिल्लीत भाजप नेते अमित शहा यांच्या उपस्थितीत महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत खातेवाटप आणि मंत्र्यांची संख्या निश्चित केली जाणार आहे. (the formula to form government of mahayuti will be decide in Delhi; meeting with amit shah on thursday)

महाराष्ट्र विधानसभेत 288 सदस्य असून या सदस्य संख्येच्या 15 टक्के इतका आकार मंत्रिमंडळाचा असतो. त्यामुळे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह 43 मंत्री राहू शकतात. यापैकी कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांची संख्या ठरविण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. भाजपकडून साधारणतः पाच आमदारांच्या मागे एक मंत्रिपद हे सूत्र लावले जाऊ शकते. तसे झाले तर भाजपच्या वाट्याला 26, शिंदे गटाला 11 तर अजित पवार यांना 8 मंत्रीपदे मिळू शकतात. खातेवाटपात नगरविकास हे खाते शिंदे गटाकडे तर वित्त आणि नियोजन हे खाते अजित पवार गटाकडे जाऊ शकते.

- Advertisement -

हेही वाचा – Devendra Fadanvis : तुम्ही मुख्यमंत्री बनावे, कार्यकर्त्यांची इच्छा; प्रश्नावर फडणवीसांनी हातच जोडले

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनी अनुक्रमे ठाणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती देताना उद्या (गुरुवार) नवी दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती दिली. या बैठकीत मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा निर्णय होईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शिंदे आणि अजित पवार यांच्या वाट्याला उपमुख्यमंत्रिपद येण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

महत्त्वाची खाती भाजप स्वतःकडे ठेवणार

महायुतीच्या सत्तावाटपात भाजप मुख्यमंत्रिपदसह महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजपकडे सामान्य प्रशासन, गृह, महसूल, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा, ग्रामविकास, सामाजिक न्याय, इतर मागास आणि बहुजन कल्याण मंडळ आदी महत्त्वाची खाती राहतील.

शिंदे गटाला नगरविकास, उद्योग, सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) शालेय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, राज्य उत्पादन शुल्क, पाणी पुरवठा आणि अजित पवार गटाला वित्त तसेच नियोजन, सहकार, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री, गृहनिर्माण, कृषी ही खाती मिळू शकतात.

हेही वाचा – Eknath Shinde : ‘CM’पदावरील दावा सोडला, राज्यात राहणार की केंद्रात जाणार? प्रश्न विचारताच शिंदे म्हणाले, “अरे…”

दरम्यान, महायुतीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज नवी दिल्लीत अमित शहा यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत महायुतीच्या सत्तेतील वाट्याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. (the formula to form government of mahayuti will be decide in Delhi; meeting with amit shah on thursday)


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -