जून महिन्यात कोरोनाची चौथी लाट, टास्क फोर्सचा मास्क सक्तीचा प्रस्ताव

देशातील काही राज्यांमध्ये कोरोना वेगानं पसरत असून, दिल्ली, कर्नाटक आणि इतर राज्यांत कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. याच संदर्भात सोमवारी टास्क फोर्सच्या सदस्यांच्या झालेल्या बैठकीत एक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तसेच तो प्रस्ताव टास्क फोर्सच्या सदस्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे सुपूर्द केला आहे.

Government recommends no masks for kids aged below 5 years in new Covid guidelines
Corona Guidelines for Childrens: ५ वर्षांच्या मुलांना मास्कची सक्ती नाही! एंटीव्हायरल वापरासाठी केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स जाहीर

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचं चित्र आहे. राज्यातील रुग्णसंख्या झपाट्यानं खाली आली होती. मात्र आता ही कोरोना रुग्ण संख्या पुन्हा वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आता पुन्हा एकदा कोरोनाच्या चौथ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. जून महिन्यात कोरोनाची चौथी लाट येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशातील काही राज्यांत कोरोनाचा फैलाव वाढत आहे. आता कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता टास्क फोर्सनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पुन्हा मास्क सक्ती करण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर येत आहे.

देशातील काही राज्यांमध्ये कोरोना वेगानं पसरत असून, दिल्ली, कर्नाटक आणि इतर राज्यांत कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. याच संदर्भात सोमवारी टास्क फोर्सच्या सदस्यांच्या झालेल्या बैठकीत एक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तसेच तो प्रस्ताव टास्क फोर्सच्या सदस्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे सुपूर्द केला आहे.

कोरोनाचे वाढत असलेले रुग्ण पाहता राज्यात मास्कचा वापर वाढविणे, लसीकरणाला आणखी वेग देणे, रुग्णांचा शोध घेणे, जिनोम सिक्वेन्सिंगवर भर देणे आवश्यक असल्याचे प्रस्तावात अधोरेखित करण्यात आले आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचा धोका लक्षात घेत मास्कचा वापर आवश्यकच असून, किमान गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक करावे, असे टास्क फोर्स सदस्यांचे म्हणणे आहे. विशेषतः चित्रपटगहे, नाट्यगृहे, मॉल्स अशा ठिकाणी संसर्गाचा धोका लक्षात घेऊन या ठिकाणी मास्कसक्ती असावी, असे मत या सदस्यांनी मांडले. सध्या संसर्ग झालेली व्यक्ती ही रॅपिड टेस्ट करून स्वतःला घरातच विलग करत आहे. अनेकजण आरटीपीसीआर करणे टाळत असून, त्या चाचण्यांवर भर देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.


हेही वाचाः मुंबईतील ३३७ अतिधोकादायक इमारतींमधील हजारो नागरिकांचा जीव टांगणीला