कोल्हापूर : दरदिवशीच्या तुलनेत कोल्हापुरातील आजचा दिवस जरा वेगवानच ठरत आहे. निमित्त आहे ते गोकुळ दूध महासंघाच्या सर्वसाधारण सभेचे. आज कोल्हापुरातील गोकुळ दूध महासंघाच्या बैठकीवरून आरोप-प्रत्यारोप केले जात असून, ही सभा सध्या वादळी ठरत आहे. तर परिस्थीतवर नियंत्रण मिळवताना पोलिसांची दमछाक होत आहे.(The general meeting of Gokul Milk Federation is going to be stormy Just a round of accusations and counteraccusations)
कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध असलेल्या गोकुळ दूध महासंघाची आज सर्वसाधारण होत आहे. गोकुळ शिरगावमधील पंचतारांकित वसाहतीच्या मैदानात होत असलेल्या या सर्वसाधारण सभेत हजारोच्या संख्येने सदस्य आणि नागरिक सहभागी झाल्याने या परिसरात तोबा गर्दी झाली आहे. मात्र, गोकुळ दूध महासंघावरून कोल्हापुरात राजकारणही पेटलेले आहे. त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय या महासंघाच्या सर्वसाधारण सभेवरून दिसून आला आहे.
तीन गट आमने-सामने
गोकुळ दूध महासंघाच्या सर्वसाधारण सभेच्या आधीपासून सत्ताधारी सतेज पाटील गट, हसन मुश्रीफ गट व विरोधातील महाडिक गट यांच्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगल्याचं दिसून आलं. आज सभेच्या दिवशीही तेच दिसून आले. यादरम्यान सभेला आलेले निम्म्याहून अधिक सदस्य बोगस असल्याचा खळबळजनक आरोप शौमिका महाडिक यांनी केला असून, त्याला सतेज पाटील व हसन मुश्रीफांनी प्रत्युत्तर दिले आहे.
हेही वाचा : कुणबी जात प्रमाणपत्र घेतलंच पाहीजे ही जबरदस्ती नाही; जरांगे पाटलांचे राणेंना उत्तर
महाडिक गटाकडून सभास्थळी गोंधळ
होत असलेल्या सर्वसाधारण सभेच्या सभास्थळी महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांनी दुपारी एक ते दीड वाजताच्या सुमारास गोंधळ घालायला सुरुवात केली. सभेत जाण्यापासून मज्जाव करण्यात आल्याचा, तसेच सभास्थळी बॅरिकेट्स लावून सदस्यांना रांग लावायला सांगितल्याचा दावा महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. तर काही कार्यकर्त्यांनी बॅरिकेट्स तोडून सभेत शिरण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याची माहिती आहे.
हेही वाचा : कुणबी जात प्रमाणपत्र घेतलंच पाहीजे ही जबरदस्ती नाही; जरांगे पाटलांचे राणेंना उत्तर
निम्म्याहून अधिक सभासद बोगस-महाडिक
सभास्थळी आलेल्या सदस्यांवरून महाडिक गटाने गंभीर आरोप केले आहेत. उपस्थित सदस्यांपैकी निम्म्याहून अधिक सभासद बोगस आहेत. हे सभासद झेरॉक्स घेऊन आले आहेत. इथेच झेरॉक्स वाटण्यात आल्याचेही समजलंय. बाहेर थांबलेले अनेक खरे सभासद अजून आत गेलेले नाहीत. दोन किलोमीटरपर्यंत रांग लावलेली आहे. एका तासापासून हे लोक तिथे थांबलेले आहेत असा आरोप महाडिक यांनी केला.
मुश्रीफ, पाटलांचा महाडिकांना प्रत्युत्तर
शौमिका महाडिक यांनी केलेल्या आरोपांनंतर सत्तेत असणारे सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ गटांने त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी हसन मुश्रीफ म्हणाले की, सभेसाठी सभासद एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आमचा सत्तारूढ पक्ष आहे. आम्ही शांततेत सभा घेणार. सभासदांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातील. असे हसन मुश्रीफ म्हणाले. तर सतेज पाटील म्हणाले की, सभासद आधी येऊन बसले आहेत. महाडिकांचे गुंड दारात येऊन दंगा करत आहेत. हे कोल्हापूरच्या दृष्टीने, सहकाराच्या दृष्टीने अशोभनीय आहे. जे काही प्रश्न आहेत, त्याची उत्तरं संचालक मंडळ देणार असल्याचे ते म्हणाले.