Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश सत्ता काबिज करणे हेच 'घमंडिया' आघाडीचे लक्ष्य, पण...; भाजपाचे व्हिडोओद्वारे शरसंधान

सत्ता काबिज करणे हेच ‘घमंडिया’ आघाडीचे लक्ष्य, पण…; भाजपाचे व्हिडोओद्वारे शरसंधान

Subscribe

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) आव्हान देण्यासाठी प्रमुख विरोधक एकवटले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत रालोआ विरोधात विरोधकांची आघाडी ‘इंडिया’ अशी लढत होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरुवात झाली असून सत्ता काबिज करणे हेच ‘घमंडिया’ आघाडीचे लक्ष्य असल्याची टीका भाजपाने केली आहे. पण त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा सत्तेवर येतील, असा विश्वासही भाजपाने व्यक्त केला आहे.

- Advertisement -

सत्ताधारी भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी विरोधक पुन्हा एकवटले आहेत. देशात हुकूमशाही येत असल्याचा आरोप करत विरोधकांनी येत्या लोकसभा निवडणुकीसाठी एकजूट दाखविली आहे. 23 जून 2023 रोजी विरोधकांची पहिली बैठक बिहारमधील पाटणा येथे झाली. त्या बैठकीला 15 विरोधी पक्ष उपस्थित होते. त्यानंतर दुसरी बैठक 18 जुलै 2023 रोजी बंगळुरूमध्ये झाली. या बैठकीत 26 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली. या बैठकीत विरोधकांच्या आघाडीचे ‘इंडिया’ असे नामकरण करण्यात आले. आता मुंबईत या आघाडीची तिसरी बैठक सुरू आहे. ग्रॅण्ड हयात या पंचतारांकित ह़ॉटेलमधील बैठकीत आघाडीच्या समन्वयकाबरोबरच विविध समित्यांबाबत विचारमंथन सुरू आहे.

हेही वाचा – इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण? अनिल देसाईंनी दिलं उत्तर, म्हणाले…

- Advertisement -

मात्र, या बैठकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला असून घमंडिया टोळीला फक्त स्वतःचा, स्वतःच्या कुटुंबाचा विकास करायचा आहे. त्यांच्या डोळ्यात भारतीय जनता पक्षाने सुरू केलेली विकासकामे आणि भारताची प्रगती खुपत आहेत. पण दुसरीकडे भारतीय जनतेलाच नाही तर संपूर्ण जगाला मोदी यांच्या कर्तृत्वावर आणि नेतृत्वावर विश्वास आहे, असा दावा केला आहे.

हेही वाचा – संधिसाधूंचा मुंबापुरीत जमलाय गोतावळा सारा…, चित्रा वाघ यांची कवितेतून टीका

यासोबत दिलेल्या व्हिडीओमध्ये भाजपाने प्यू रिसर्च सेंटरसह (Pew Research Center) विविध सर्वेक्षणांचे दाखले दिले आहेत. 2014मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर देशाची विकासात घोडदौड सुरू असून मोदी यांनी तळागाळापर्यंत विकास पोहोचवला. पण ‘घमंडिया आघाडी’ला हे पाहावत नाही. कधीकाळी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले केवळ सत्तेसाठी एकत्र आले आहेत. पण जनताजनार्दन भोळी नाही. विरोधकांनी दिशाभूल करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी, तो जनता हाणून पाडेल, असा विश्वास भाजपाने व्यक्त केला आहे.

- Advertisment -