घरताज्या घडामोडीमराठीच्या संवर्धनासाठी शासन उदासीन

मराठीच्या संवर्धनासाठी शासन उदासीन

Subscribe

मधु मंगेश कर्णिक यांची खंत ; जनस्थान पुरस्कार प्रदान सोहळा

राज्यात मराठी विषयी बोलणारे खूप वक्ते निर्माण झाले; परंतु आजही मराठीच्या संवर्धनासाठी, विकासासाठी कोणीही प्रयत्न करतांना दिसत नाही. शासनही मराठीच्या संवर्धनासाठी उदासीन असल्याची खंत पदमश्री मधू मंगेश कर्णिक यांनी व्यक्त केली. कुसुमाग्रज प्रतिष्ठानने जनस्थानच्या माध्यमातून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याकरीता प्रयत्न करावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने दिला जाणारा जनस्थान पुरस्कार मधु मंगेश कर्णिक यांना प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे आयोजित या सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष न्या.नरेंद्र चपळगांवकर, प्रतिष्ठानचे विश्वस्त अ‍ॅड. विलास लोणारी, स्मारक समितीचे अध्यक्ष हेमंत टकले आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना मधु मंगेश कर्णिक यांनी मराठी भाषेच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, १९६० साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा मुंबईमध्ये मराठीचा टक्का ५२ टक्के होता. आज ४० वर्षानंतर राज्याच्या राजधानीत मराठीचा टक्का २२ टक्क्यांवर आला आहे. देशातील सर्व भाषिकांचे भाषा भवन मुंबईत आहे पण, मराठी भाषा भवन अजून होऊ शकले नाही ही शोकांतिका आहे. याबाबत आजवरच्या अनेक सांस्कृतीक मत्र्यांंकडे पाठपुरावा करून देखील याबाबत शासनाची उदासिनताच दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. शासन कोणाचेही असो मराठीचा आदर सर्वजण व्यक्त करतात. परंतु, प्रत्यक्षात काहीच करत नाही असे सांगत, शासनाच्या भूमिकेविषयी जाहीर नाराजी प्रकट केली. राजकीय नेत्यांच्या मराठी प्रेमाविषयी वक्तव्य करतांना त्यांनी जोरदार फटकारे ओढले. मराठीसाठी बोलणारे अनेक वक्ते तयार झाले परंतु मराठीच्या जतनासाठी कोणीही प्रयत्न करतांना दिसत नाही अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या माध्यमातून मराठी भाषेच्या अभिजात दर्जासह मराठी भाषाभवन, विद्यापीठ निर्मीतीसाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

कार्यक्रमाची सुरूवात जीवन या कुसुमाग्रजांच्या कवितेने करण्यात आली. यावेळी सुप्रसिध्द नाटककार जयंत पवार यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. मकरंद हिंगणे यांनी प्रास्ताविक केले. साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या आजवरच्या प्रवासाचा जीवनपट यावेळी लघुचित्रफितीव्दारे उलगडण्यात आला. अ‍ॅड. विलास लोणारी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. मानपत्राचे वाचन विश्वस्त अरविंद ओढेकर यांनी केले. शिल्पा देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. अजय निकम यांनी आभार मानले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -