मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांचे प्राण वाचविण्यात यश मिळविले आहे. गोरगरीब – गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून अर्थसहाय्य केले जात असून, आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या 14 महिन्यांत 13 हजारपेक्षा अधिक गोरगरीब -गरजू रुग्णांना एकूण 112 कोटी 12 लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे.(The government rushed to help the needy; 112 crore assistance from the Chief Minister’s Medical Assistance Fund)
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारताच महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद पडलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष तत्काळ सुरू केला. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची मूळ संकल्पना मांडणाऱ्या मंगेश चिवटे यांची विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती करून एकनाथ शिंदे यांनी या कक्षाची जबाबदारी दिली होती.
या कक्षाकडून गेल्या वर्षी पहिल्याच जुलै महिन्यात 178 रुग्णांना 76 लाखांची मदत देण्यात आली. नंतर ऑगस्ट महिन्यात 244 रुग्णांना 1 कोटी 1 लाख, सप्टेंबर महिन्यात 319 रुग्णांना 1 कोटी 86 लाख, ऑक्टोबर महिन्यात 276 रुग्णांना 2 कोटी 35 लाख, नोव्हेंबर महिन्यात 527 रुग्णांना 4 कोटी 50 लाख, डिसेंबर महिन्यात 1031 रुग्णांना 8 कोटी 52 लाख, जानेवारी 2023 मध्ये 1032 रुग्णांना 8 कोटी 90 लाख तर फेब्रुवारी 2023 मध्ये 1274 रुग्णांना 10 कोटी 59 लाख, मार्च 2023 मध्ये 1469 रुग्णांना 11 कोटी 93 लाख, एप्रिल मध्ये 1190 रुग्णांना 9 कोटी 91 लाख, मे मध्ये 1329 रुग्णांना 11 कोटी 25 लाख, तर जूनमध्ये 1728 रुग्णांना 14 कोटी 62 लाख, जुलै 1488 रुग्णांना 12 कोटी 72 लाख, तर ऑगस्टमध्ये विक्रमी 1567 रुग्णांना 13 कोटी 14 लाख, रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.
हेही वाचा : नरेंद्र मोदींना विचारा गेट वे ऑफ इंडियाला काय म्हणू? शरद पवारांचा थेट सवाल
विविध आजारावर केले जातात उपचार
मुख्यमंत्री शिंदे यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये अनेक-विविध आजारांचा समावेश देखील करण्यात आला असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली आहे. यामध्ये अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी , कर्करोगावरील शस्त्रक्रिया , केमोथेरपी, डायलिसिस, जन्मतः मूकबधिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर इनप्लांट शस्त्रक्रिया , सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात , विद्युत अपघात , भाजलेले रुग्ण , जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे.
हेही वाचा : शाहरूखसोबतच्या वादाबाबत सनी स्पष्टच बोलला; म्हणाला- तो बालीशपणा…
गरजूंनी लाभ घ्यावा
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा,, असे आवाहन कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी केले आहे.