घरताज्या घडामोडीरेमडेसिवीरचा काळाबाजर करणाऱ्यांवर सरकारने कारवाई करावी, अन्यथा मनसे स्टाईलने कारवाई करण्यात येईल...

रेमडेसिवीरचा काळाबाजर करणाऱ्यांवर सरकारने कारवाई करावी, अन्यथा मनसे स्टाईलने कारवाई करण्यात येईल – मनसे

Subscribe

कोविडच्या रुग्णांना उपचारासाठी रेमेडेसिवीर व टोसिलीझुमाब इंजेक्शन्नची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे.

रेमेडिसिवीर -टॉसिलीझूमाब इंजेक्शन सुलभ व्हावे, तसेच या इंजेक्शनचा औषध विक्रेत्यांद्वारे होणारा काळा बाजार त्वरित थांबवा या मागणी संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले असून या इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर राज्य सरकारने कारवाई न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईलने या काळाबाजार करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करेल असेही नांदगावकर यांनी पत्रात म्हटले आहे.

कोविडच्या रुग्णांना उपचारासाठी रेमेडेसिवीर व टोसिलीझुमाब इंजेक्शन्नची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार रेमडेसिवीर व टोसिलीझुमाब इंजेक्शन खुल्या बाजारात वितरकांच्या माध्यमातून विक्री करण्यास बंदी घालण्यात आली. खाजगी हॉस्पिटलने आपापल्या रुग्णांसाठी जिल्हाधिकारी/आयुक्‍त यांच्या माध्यमातून रेमेडेसिवीर व टोसिलीझुमाब इंजेक्शनची व्यवस्था करणे बंधनकारक आहे.

- Advertisement -

मुंबई महानगरपालिका आयुकत यांनी केवळ मनपा संचलित कोविड सेंटरसाठी रेमेडेसिवीर इंजेक्शान उपलब्ध केले आहेत आणि मुंबईमधील जिल्हाधिकारी यांना रेमेडेसिवीर व टोसिलीझुमाब इंजेक्शन बाबत कोणताही अधिकार नसल्याचे सांगण्यात येते. मग अशा परिस्थितीत खाजगी हॉस्पिटलला रेमेडेसिवीर व टोसिलीझुमाब इंजेक्शनचा पुरवठा कोण करणार?

आज सर्व खाजगी हॉस्पिटल सर्रासपणे रुग्णांना बाहेरून रेमेडेसिवीर व टोसिलीझुमाब इंजेक्शन आणण्याससाठी चिठी देत आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक व उर्वरीत महाराष्ट्रात रेमेडेसिवीर इंजेक्शनचा खूप मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत आहे. शेकडो नागरिकांचे आज रेमेडेसिवीर इंजेक्शन न मिळाल्यामुळे जीव जात आहेत.The government should take action against those who blackmailed Remdesivir, otherwise action will be taken in MNS style

- Advertisement -

वास्तविक पाहता, मुंबई महानगरपालिकेने रेमेडेसिवीर इंजेक्शन खरेदी करून कोविड सेंटरच्या माधमातून सर्व खाजगी हॉस्पिटलला उपलब्ध करून देणे सोयीचे होते. रेमेडेसिवीर इंजेक्शनची सुलभ उपलब्धता होण्यासाठी मुंबईमधील सर्व खाजगी हॉस्पिटलला त्यांच्या कडील रुग्णासाठी, मुंबई महानगरपालिकेने रेमेडेसिवीर इंजेक्शन कोविड सेंटर येथून उपलब्ध करून द्यावे. त्याच बरोबर सदर बाबत योग्य ते स्पष्ठ आदेश जिल्हाधिकारी/आयुक्‍त यांना द्यावे.

त्याचबरोबर, रेमेडेसिवीर व दोगधनन र्‍माब इंजेक्हानचा काळाबाजार करणार्‍यांवर लवकरात लवकर सरकारने कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना बीची होणारी पिळवणूक थांबविण्यासाठी मनसे स्टाईल यांच्यावर कारवाई करेल.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -