घरताज्या घडामोडीपीपीई कीट घालून सोलापूरच्या पालकमंत्र्यांनी घेतला शासकीय कोरोना रुग्णालयाचा आढावा

पीपीई कीट घालून सोलापूरच्या पालकमंत्र्यांनी घेतला शासकीय कोरोना रुग्णालयाचा आढावा

Subscribe

कोरोना परिस्थितीवर आढावा बैठक

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. राज्यात जिल्हा शासकीय कोरोना रुग्णालयात अनेक कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. सोलापूरमधील शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांबाबत गेल्या काहीदिवसांपासून तक्रारी येत होत्या, यामुळे जिल्हायाचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वतः पीपीई कीट घालून थेट कोविड वार्डात जाऊन पाहणी केली आहे. यावेळी दत्तात्रय भरणे यांनी रुग्णांची भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली. रुग्णांना चांगल्या प्रकारचा आहार भेटत असून रुग्णांनी त्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. पालकमंत्र्यांनी अचानक रुग्णालयाला भेट दिल्यामुळे सर्वच अधिकारी अवाक झाले होते.

काय म्हणाले दत्तात्रय भरणे

सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात मिळत असलेल्या उपचार बाबत आणि स्वच्छतेबाबत अनेक वेळा तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यामुळे अचानक भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला. यावेळी रुग्णांनी मिळत असलेल्या सेवेबाबत समाधान व्यक्त केल्याची यावेळी शासकीय रुग्णालयातील मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ.प्रसाद, डॉ.चिटणीस,डॉ. अग्रवाल इत्यादी उपस्थित होते.civil hospital,Corona cases,Corona Update,Dattatray Bharane,guardian minister,PPE kit,solapur,solapur corona,पालकमंत्री दत्तात्रय भरणे,पीपीई कीट घालणे,पीपीई कीट, दत्तात्रय भरणे,शासकीय कोरोना रुग्ण,रुग्णालयाचा आढावा, कोरोना रुग्ण,पालकमंत्री,सोलापूर,

- Advertisement -

कोरोना परिस्थितीवर आढावा बैठक

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्ह्यात कोरोना रुग्णासाठी बेड आणि ऑक्सिजन पुरवठा सुरळीतर सुरु ठेवण्यासाठीच्या सूचना देण्यात आली आहे. आज अक्कलकोट येथे कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी कोरोना विषाणूची सद्यस्थिती, प्रशासनाच्या वतीनं करण्यात येणाऱ्या उपाययोजना तसंच लसीकरणाबाबत माहिती जाणून घेतली.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -