घरCORONA UPDATETechnology : हेडफोन १० मिनिटे चार्ज केल्यावर १० तास चालतात

Technology : हेडफोन १० मिनिटे चार्ज केल्यावर १० तास चालतात

Subscribe

वनप्लस ८ सिरीज सोबत कंपनीने OnePlus Bullets Wireless Z हेडफोन्स ही लॉन्च केले.

वनप्लस (OnePlus) ने ऑनलाइन लॉंचिंग इव्हेंटमध्ये वनप्लस ८ सिरीज लॉन्च केली आहे. वनप्लस ८ सिरीज सोबत कंपनीने OnePlus Bullets Wireless Z हेडफोन्स ही लॉन्च केले. हे वनप्लस बुलेट हेडफोन लाइन अपचा लेटेस्ट मॉडेल आहे. कंपनीने गेल्यावर्षीच्या मे महिन्यात बुलेट वायरलेस २ (Bullet Wireless 2) हेडफोन लॉन्च केले होते. नवीन बुलेट वायरलेस हेडफोन्सला $४९.९५ म्हणजेच ३८०० रुपये या किंमतीमध्ये लॉन्च केले होते. फक्त १० मिनिटांच्या चार्जिंगमध्ये १० तासाचा बॅकअप बुलेट वायरलेस २ प्रमाणे हे नवीन हेडफोन्स पण १० मिनिटांत १० तासांचा ऑडिओ प्लेबॅक बॅकअप देते. तसेच फुल्ल चार्ज झाल्यावर हे हेडफोन २० तास बॅटरी बॅकअप देते. मागील मॉडेलपेक्षा ६ तास जास्त आहे. हे हेडफोन USB-C केबलने चार्ज होतात. याआधी लॉन्च झालेले दोन मॉडेल ही याच चार्जिंगने चार्ज होत होते.

वॉटर प्रूफिंगसाठी IP55 रेटिंग

हेडफोन्स IP55 रेटिंग सोबत मिळतात. IP55 रेटिंग म्हणजे पावसाळ्यातही हे हेडफोन आरामात चालतात. परंतु जास्त खराब वातावरणात या हेडफोनला वापरण्यास त्रास होऊ शकतो.

- Advertisement -

सहज हाताळू शकता

हेडफोन्सच्या इयर बडच्या मागे मॅग्नेट दिले आहे. त्यामुळे या हेडफोनला गळ्यात नेकलेस प्रमाणे अडकवू शकता. त्यामुळे यांना हाताळणे सोपे आहे.

वनप्लस डिव्हाईसमध्ये सहज कनेक्ट होतात

हे हेडफोन वनप्लस डिव्हाईसमध्ये सहज कनेक्ट होतात. बुलेट वायरलेस Z हेडफोन ब्लूटूथ 5.0 सपोर्टबरोबर मिळतात. अद्याप कंपनीने हे स्पष्ट नाही केले की, हेडफोन्स भारतामध्ये केव्हा लॉन्च करणार.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -