मुंबई : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्राकारांबाबत पदाधिकाऱ्यांना दिलेल्या सल्ल्याची एक ऑडिओ क्लिप खूप व्हायरल झाली. बुथवर जे चार, पाच पत्रकार आहेत त्यांची यादी तयार करा. यात एक, दोन पोर्टलवाले, प्रिंट आणि इलेक्टॉनिकवाले असतील, त्यांना महिन्यातून एकदा चहा प्यायला बोलवा, चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला. त्यात काही कमी जास्त झाले तर सुजय विखे आहेतच असं त्यांनी म्हटलं. बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर विरोधाकांनी त्यांच्यावर जोरदार टीका करण्यास सुरूवात केली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही चंद्रशेखर बावनकुळेंना टोला लगावला आहे. (The idea came out of the fertile heads of the Chandrashekhar Bawankules because of a delusion Thackeray group Ambadas Danve)
हेही वाचा – Kirit Somaiya : कथित व्हिडीओ पुन्हा चर्चेत; व्हायरल करण्याची धमकी देत मागितली खंडणी, सोमय्यांचा आरोप
अंबादास दानवे यांनी ट्वीट करताना म्हटले की, आपण सर्वांना आणि सगळं काही विकत घेऊ शकतो, या भंपक भ्रमामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सुपीक डोक्यातून ही कल्पना बाहेर आली आहे. त्यांनी एवढंच सांगावं, हा आविष्कार त्यांचा आहे की, त्यांच्या पक्षातील बॉसने असे फर्मान जारी केले आहे? माध्यमे तुमच्याच इशाऱ्यावर चालतील, असे दिवस अजून तरी आलेले दिसत नाहीत. कारण असे असते तर त्यांनी तुम्हाला माणिपूरचा आरसा दाखवला नसता चंद्रशेखर बावनकुळे असा टोलाही त्यांनी लगावला आहे. असले धंदे जनमतही बदलत नाही. कर्नाटक निवडणूक त्याचे जवळचे उदाहरण आहे, असेही अंबादास दानवे म्हणाले. दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
12 पत्रकार विकले गेले म्हणून…
विजय वडेट्टीवार म्हणाले की, तुम्ही राज्यातील पत्रकारांना काय चिरमिरी घेणारे समजताय का? देशातील 12 पत्रकार विकले गेले म्हणून सगळे पत्रकार स्वत:चा इमान विकतील असं नाही. दुसऱ्यांचे पक्ष फोडून, ईडी सीबीआयसारख्या संस्थांचा धाक दाखवूनही भाजपाविरुद्ध आवाज दाबला जाणार नाही. दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत तुमच्या पक्षातील सर्व नेत्यांची आणि अंधभक्तांची वाढलेली अस्वस्थता आम्ही समजू शकतो. पण त्यामुळे तुम्ही थेट पत्रकारांना चिरीमिरी द्यायला निघाले? तुमची आजची अवस्था पाहून आगामी निवडणुकीत तुम्ही मतांसाठी जनतेलासुद्धा चिरीमीरी देण्याचा प्रयत्न करणार हे नक्की… पण जनता 2024 मध्ये भाजपाची चिंधी उधळल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चित आहे, असा हल्लाबोल विजय वडेट्टीवार यांनी केला होता. दरम्यान, विरोधकांनी होत असलेल्या टीकेनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
हेही वाचा – गंभीर विषयाकडे पाहण्याऐवजी कार्टून फिल्म बघाव्यात, दानवेंचा नितेश राणेंना सल्ला
बावनकुळेंचं स्पष्टीकरण
माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आपण एवढं चांगलं काम करतो, म्हणून मी असचं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षात खूप चांगलं कालं केलं आहे. तरीदेखील खूप निगेटिव्ह बातम्या येत असतात. पत्रकारांना चहा प्यायला बोलवा किंवा तुम्ही त्यांच्याकडे चहा प्यायला जा आणि त्यांना खरी वस्तुस्थिती सांगा. कारण, शेवटी समाजात पत्रकारांना मोठं स्थान आहे. पत्रकार आपल्या न्यायवस्थेतील चौथा स्तंभ आहे. पत्रकारांना सन्मान देऊन त्यांच्यासोबत चांगलं वागा, या अर्थानं मी ते विधान केलं आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाईट हेतू नव्हता, असं स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे.
बावनकुळे काय म्हणाले?
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ज्या बुथवर तुम्ही काम कराल तेथे इलेक्ट्रॉनिक्स मीडियावाले कोण आहेत, पोर्टलवाले कोण आहेत हे पाहावे. आपण एवढे चांगले काम करतोय, पण हे असं काही टाकतात की, जणू गावात बॉम्बच फुटलाय. यासाठी बुथवर जे चार, पाच पत्रकार आहेत त्यांची यादी तयार करा. यात एक, दोन, पोर्टलवाले कोण आहेत हे पाहावे. आपण एवढे चांगले काम करतोय, पण हे असे काही टाकतात की, जणू गावात बॉम्बच फुटलाय. यासाठी बुथवर जे चार, पाच पत्रकार आहेत त्यांची यादी तयार करा. यात एक, दोन पोर्टलवाले, प्रिंट आणि इलेक्टॉनिकवाले असतील, त्यांना महिन्यातून एकदा चहा प्यायला बोलवा, चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला. त्यात काही कमी जास्त झाले तर सुजय विखे आहेतच असं त्यांनी म्हटलं होतं. बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला आहे.