घरमहाराष्ट्रपुढील 48 तासात मध्य महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, तर कोकणासह मुंबई, नवी मुंबईत...

पुढील 48 तासात मध्य महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, तर कोकणासह मुंबई, नवी मुंबईत तापमानात वाढ

Subscribe

मुंबई | राज्याच्या विविध भागात ऐन एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. त्यातच कुठे उष्णतेची लाट येत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. राज्याच्या विविध भागात २२ एप्रिलपर्यंत पावसाचा अंदाज हवामान विभागाने (India Meteorological Department) वर्तविला आहे. मध्य महाराष्ट्रात येत्या ४८ तासांत पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मात्र, कोकणच्या (Konkan) उत्तरेकडील भागातील नागरिकांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे. यात कोकणासह, मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे भागातील तापमानाचा आकडा वाढणार आहे. तर किनापट्टी भागातील तापमना ३७ अंश किंवा त्यापेक्षाही अधिक होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

दरम्यान, विदर्भतील काही भागामध्ये गुरुवारी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यामुळे विदर्भातील काही भागांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. नागपुरातील नरखेड तालुक्यात गारपीट झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच मुक्तापुर पेठ, खैरगाव, मदना, वडा उमरी, जलालखेडा, खडकी आणि देवग्राम या भागात गारपीट झाल्याने संत्र आणि मोसंबी या फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सांगलीतील मिरज भाग आणि पुणे येथे देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यातील सिंहगड रोड, कोथरूड, वारजे परिसरात देखील गारपीट झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

- Advertisement -

विदर्भातील तापमानता कमालीची वाढ

मे महिना सुरू झाला नसला तरीही विदर्भाच्या बहुतांश भागातील तापमानात वाढ झालेली आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील तापमानाने उच्चांक काढला आहे. सोलापुरात गुरुवारी ४२.२ अंश सेल्सिअस ऐवढ्या तापमानाची नोंद झाल्याची माहिती मिळाली आहे. मालेगाव आणि साताऱ्याची परिस्थिती फार वेगळी नाही. साताऱ्यातील तापमान ४० अंशापर्यंत पोहोचला आहे. यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

- Advertisement -

देशातील ‘या’ भागात पुढील २४ तासांत पाऊसाचा अंदाज

येत्या २४ तासांमध्ये नागालँड, मेघालय, पंजाबचा उत्तर भाग, सिक्कमी आणि आसाम येथे मध्यम स्वरुपाच्या पाऊसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर काही ठिकाणी गारपीटीचा इशारा देखील देण्यात आला आहे. तसेच लडाख, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंड भागात हलक्या सरी बरसतील, असा अंदाज सुद्धा हवामान विभागाने वर्तविला आहे. तर डोंगराळ भागांत हिमवृष्टी होण्याचा अंदाज वर्तविला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -